गुजरात: 9 रुपयांचा घोळ अंगाशी आला, 15 लाख रुपयांना मुकला; परिवहन विभागाच्या बस चालकाला झटका

कर्तव्यातील चुकीमुळे या कर्मचाऱ्याच्या वेतनात तब्बल 15 लाख रुपयांची घट झाली.

Bus | Image only representative purpose (Photo credit: File Image)

बसचालक म्हणून काम करणाऱ्या गुजरात रस्ते परिवहन (Gujarat State Road Transport ) विभागाच्या एका कर्मचाऱ्याला केवळ 9 रुपयांचा घोळ तब्बल 15 लाख रुपयांना पडला आहे. गुजरात राज्य रस्तेवाहतूक मंडळ कायद्यान्वये या कर्मचाऱ्याला इतक्या मोठा आर्थिक फटका बसला आहे. चंद्रकांत पटेल असे या बस चालकाचे नाव आहे. कामात हालगर्जीपणा तसेच 9 रुपयांच्या स्वार्थामुळे या कर्मचाऱ्यास गुजरात (Gujarat) राज्य परिवहन मंडळाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. कर्तव्यातील चुकीमुळे या कर्मचाऱ्याच्या वेतनात तब्बल 15 लाख रुपयांची घट झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरात परिवहन मंडळाच्या चौकशी समितीने बस चालक चंद्रकांत पाटेल या कर्मचाऱ्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच, कर्तव्याच्या ठिकाणी स्वर्थ दाखवल्याबद्दल दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षा म्हणून त्याचे मासिक वेतन दोन श्रेणींनी घटवले. इतक्या मोठ्या प्रमाणावर वेतन घटवल्यामुळे या कर्मचाऱ्याची वेतनश्रेणी कमालीची घसरली आहे. इतकेच नव्हे तर, परिवहन विभागाने कठोर शब्दांत म्हटले आहे की, यापुढे हा कर्मचारी आपल्या विशिष्ट वेतनावरच आपला पुढचा संपूर्ण सेवाकाल पूर्ण करेन.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण तब्बल 2003 मधील आहे. परिवहन विभागाच्या एका धाड पथकाने 5 जुलै 2003 मध्ये चंद्रकांत पटेल यांच्या बसला भेट दिली. यात एक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळला. प्रवाशाने तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना सांगितले की, मी तर बस चालकाला प्रवासभाड्याची रक्कम म्हणून 9 रुपये दिले होते. परंतू, बस चालकाने मला तिकीटच नाही दिले. हे प्रकरण पुढे वाढले. परिवहन विभागाने चंद्रकांत पटेल यांची या प्रकरणात विभागीय चौकशी लावली. या चौकशीत ते दोषी आढळले.

दरम्यान, तब्बल एक महिना चौकशी समितीचे कामकाज चालले. महिन्यांती समितीचा अहवाल आला. अहवालात चंद्रकांत पटेल दोषी आढळले. पटेल यांना या प्रकरणात शिक्षा म्हणून त्यांचे वेतन कापण्यात आले. समितीच्या अहवालानंतर चंद्रकांत पटेल हे प्रकरण घेऊन औद्योगिक न्यायाधिकरणाकडे गेले आणि त्यानंतर उच्च न्यायालयात गेले. परंतू दोन्ही ठिकाणी त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली. (हेही वाचा, आंध्र प्रदेश: एका रात्रीत शेतकरी झाला लखपती, कष्टाने नव्हे नशिबाने; शेतात सापडला मौल्यवान हिरा)

दरम्यान, पटेल यांच्या वकिलाने म्हटले आहे की, इतक्या छोट्या चुकीसाठी दिलेली शिक्षा ही मोठी आहे. या शिक्षेचा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. तर, परिवहन विभागाच्या वकिलाने म्हटले आहे की, या आधीही चंद्रकांत पटेल हे हिशोबात घोळ करताना 35 वेळा सापडले आहेत. त्यांना अनेकदा किरकोळ दंड अथवा समज देऊन सोडण्या आले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif