Gujarat: 'पतीला सेक्समध्ये रस नाही, शारीरिक संबंध ठेवत नाही'; महिलेची पोलिसांकडे तक्रार, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिने म्हटले आहे की, पतीने आपल्याशी लग्न तर केले मात्र, आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून आपल्याला पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही.
विवाह हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रत्येक नवविवाहित जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल उत्सुक असते. मात्र गुजरातच्या (Gujarat) जुनागड येथे आपल्याला वैवाहिक सुख मिळाले नसल्याचा आरोप करत एका महिलेने पोलीस स्टेशन गाठले आहे. येथे एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात अनोखी तक्रार दाखल केली आहे. पत्नीचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास कोणताही रस नाही.
महिलेने पुढे म्हटले आहे कि, आपला पती आपल्यापासून दूर पळतो आणि माझे समाधान करत नाहीत. आता पोलीस कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहेत.
तक्रारीत म्हटले आहे की, या 23 वर्षीय विवाहितेचा पोरबंदर येथे फेब्रुवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. मोठ्या धूम धडाक्यात लग्न झाले. मात्र त्यानंतर नंतर केवळ दोन आठवड्यांच वधूला कळले की तिच्या पतीला शारीरिक संबंधांमध्ये अजिबात रस नाही. पत्नीने आरोप केला आहे की, जेव्हाही तिने पतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या प्रयत्नांना यश आले नाही. तिचा पती तिच्यापासून दूर पळून जायचा. पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यास त्याने कसलाही उत्साह दाखवला नाही. (हेही वाचा: नवऱ्याने हेल्मेट न घालता महिला मैत्रिणीसोबत केला स्कूटरवर प्रवास, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फोटो पाठवले बायकोच्या फोनवर)
महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिने म्हटले आहे की, पतीने आपल्याशी लग्न तर केले मात्र, आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून आपल्याला पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही. महिलेने पुढे असेही सांगितले की, तिने पतीच्या अशा वागणुकीची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता त्यांनी तिला फटकारले आणि यापुढे याबाबत काही चर्चा करण्यास मनाई केली. जेव्हा पतीला याबाबत समजले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.