Gujarat Hospital Fire Update: अहमदाबाद येथील कोविड हॉस्पिटल श्रेय रूग्णालयाला आग; 8 जणांना मृत्यू

दरम्यान श्रेय हॉस्पिटल हे कोविडसाठी विशेष हॉस्पिटल होते.

श्रेय हॉस्पिटल आग । Photo Credits: ANI/ Twitter

गुजरात मधील अहमदाबाद मध्ये आज सकाळी श्रेय हॉस्पिटलला आग लागल्याने त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान श्रेय हॉस्पिटल हे कोविडसाठी विशेष हॉस्पिटल होते. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधील इतर रूग्ण इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

श्रेय हॉस्पिटलला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तात्कळ मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अन्य अधिकार्‍यांशी बोलून घटनेची माहिती घेतली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त करत जखमींच्या आणि अन्य रूग्णांच्या प्रकृतीमध्ये तात्काळ सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

ANI Tweet

श्रेय हॉस्पिटलला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात आग लागली होती. तेथे मृत्यूमुखी पडलेले रूग्ण हे कोविड पॉझिटिव्ह होते. दरम्यान 40 रूग्णांना इतरत्र सुरक्षित हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

अहमदाबाद येथील श्रेय हॉस्पिटल मध्ये आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. Prime Minister's National Relief Fund मधून ही मदत दिली जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif