Jammu Blast: जम्मू येथील बसमध्ये झालेल्या ग्रेनेड ब्लास्टमध्ये दोघांचा मृत्यू
जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
जम्मू-काश्मीर येथील जम्मू बस सॅन्ड जवळील बसमध्ये काल (गुरुवार, 7 मार्च) झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 28 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला होता. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याने बॉम्ब ब्लास्टमध्ये मृत झालेल्यांची संख्या 2 इतकी झाली आहे. बसमध्ये ग्रेनेड हल्ला करणार्या यासिर भट्ट (Yasir Bhatt) पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू सिटी बसस्टॅन्ड परिसरात ग्रेनेड हल्ला प्रकरणात 'यासिर भट्ट'ला अटक, गुन्ह्याची कबुली दिल्याची जम्मू काश्मिर पोलिसांची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट घडवून आणण्यात दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन याचा हात होता. कालच्या स्फोटात 17 वर्षीय मोहम्मद शारीक जखमी झाला असून तो उत्तराखंडचा रहिवासी आहे. तर जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून दोघांची सर्जरी करण्यात आली आहे.
ही घटना काल दुपारी 12 वाजता घडली, त्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण परिसर बंद केला. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतावादी हल्ला करण्यात आला. त्यात CRPF चे 40 हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची स्थळं उद्धवस्त केली. त्यानंतर भारत-पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.