यमुना एक्सप्रेस-वे येथे भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू तर 30 गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) ग्रेटर नोएडा मधील यमुना एक्सप्रेस-वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात झाला आहे.

यमुना एक्सप्रेस वे येथे अपघात (फोटो सौजन्य-ANI)

उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh)  ग्रेटर नोएडा मधील यमुना एक्सप्रेस-वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

यमुना एक्सप्रेस-वेवर सकाळी 5 वाजताच्या सुमारास एक बस आणि ट्रक यांची एकमेकांना धडक लागून हा अपघात झाला आहे. तर आगरा येथून बस नोएडा येथे जाण्यासाठी निघाली असताना ही दुर्घटना झाली आहे.

या प्रकरणी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.