यमुना एक्सप्रेस-वे येथे भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू तर 30 गंभीर जखमी
उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) ग्रेटर नोएडा मधील यमुना एक्सप्रेस-वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात झाला आहे.
उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) ग्रेटर नोएडा मधील यमुना एक्सप्रेस-वे (Yamuna Express Way) येथे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील 8 जणांचा मृत्यू झाला असून 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
यमुना एक्सप्रेस-वेवर सकाळी 5 वाजताच्या सुमारास एक बस आणि ट्रक यांची एकमेकांना धडक लागून हा अपघात झाला आहे. तर आगरा येथून बस नोएडा येथे जाण्यासाठी निघाली असताना ही दुर्घटना झाली आहे.
8 dead and 30 injured after a bus rammed into a truck on Yamuna Expressway in Greater Noida pic.twitter.com/iPQQ9N8efU
— ANI UP (@ANINewsUP) March 29, 2019
या प्रकरणी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2019 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

