सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा यांची SPG सुरक्षा हटवली जाणार - सूत्र
हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतर यापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एसपीजी सुरक्षा राहणार आहे. कमेटीने केलेल्या सिफारशीनुसार गांधी कुटुंबीयांतील सदस्यांना सीआरपीएफची झेड प्लस (Z+ Security) सुरक्षा देण्यात येणार आहे.
गेली अनेक दशकं भारताच्या राजकारणात मध्यवर्थी राहिलेल्या गांधी कुटुंबीयांसदर्भात केंद्र सरकार एक महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. गांधी कुटुंबीयांना मिळणारी एसपीजी (Special Protection Group) सुरक्षा काढून घेतली जाणार आहे. या निर्णयानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी-वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांची SPG सुरक्षा हटविण्यात येणार असल्याचे समजते. या तिघांचीही सुरक्षा टप्प्याटप्याने हटविण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
एएनआय ट्विट
प्राप्त माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या सुरक्षा कमेटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतर यापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एसपीजी सुरक्षा राहणार आहे. कमेटीने केलेल्या सिफारशीनुसार गांधी कुटुंबीयांतील सदस्यांना सीआरपीएफची झेड प्लस (Z+ Security) सुरक्षा देण्यात येणार आहे. सिमितीच्या बैठकीत गांधी कुटुंबीयांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात आता या कुटुंबीयांना फारसा धोका नाही, असे पुढे आल्याने हा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची SPG सुरक्षा हटवली; झेड प्लस सुरक्षा मात्र कायम)
केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस नेते राशित अल्वी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अल्वी यांनी म्हटले आहे की, सुरक्षा हटवून केंद्र सरकार गांधी कुटूंबीयांना परेशन करु पाहात आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या आधी गांधी कुटुंबीयांतील दोन व्यक्तींची हत्या झाली आहे. त्यामुळे गांधी कुटुंबीयांना असलेला धोका विचारात घेता, ही सुरक्षा हटवायला नको होती. मात्र, भाजपला सर्व गोष्टीत राजकारणच करायचे आहे.