बॅंक व्यवहारादरम्यान चूकीचा आधार कार्ड क्रमांक दिल्यास होऊ शकतो 10,000 रूपयांचा दंड

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार ही दंडात्मक कारवाई 1 सप्टेंबर 2019 पासून लागू केली जाऊ शकते.

Rupee | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

मोठ्या रक्कमेच्या बॅंक व्यवहारांमध्ये आता आधार कार्डाचा (Aadhaar Card) करण्याची सोय देण्यात आली आहे. मात्र हा आधार कार्ड (Aadhaar Unique Identitification Number) क्रमांक चूकीचा दिल्यास संबंधितांवर 10,000 रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार ही दंडात्मक कारवाई 1 सप्टेंबर 2019 पासून लागू केली जाऊ शकते. बॅकेच्या मोठ्या रक्कमेच्या व्यवहारामध्ये चूकीचा आधार कार्ड क्रमांक आढळून आल्यास थेट दंड ठोठावण्याआधी बॅंक अधिकारी त्याचं म्हणणं ऐकून घेतील.

निर्मला सीतारमण यांनी 5 जुलै दिवशी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता करदाते पॅन कार्ड ऐवजी आधारकार्ड वापरू शकतात अशी घोषणा केली होती. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही असे करदात्यांना आधारकार्ड वापरण्याचा दिलासादायक निर्णय भारत सरकारने दिला आहे. तसेच मोठ्या रक्कमेच्या व्यवहारामध्येही आता पॅन कार्ड गरजेचे नाही. त्यामुळे कलम 272 B मध्येही बदल केले जाणार आहेत. हे कलम नियमबंग करण्यांवर कारवाई बद्दल आहे.

देशामध्ये सध्या 120 कोटी हून अधिक भारतीयांकडे आधारकार्ड आहे. तर 41 कोटी भारतीयांकडे पॅन कार्ड आहे. यापैकी 22 कोटी पॅनकार्ड्स आधार कार्डासोबत लिंक केलेली आहेत.