Goldy Brar Declared Terrorist: गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी म्हणून घोषित; केंद्र सरकारची UAPA अंतर्गत कारवाई

देशातील सर्वात मोठा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे आणि गोल्डी ब्रार हा त्याचा चांगला मित्र असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर या व्यक्तीला बिश्नोई टोळीचा सर्वात विश्वासू माणूसही म्हटले जाते.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Goldy Brar Declared Terrorist: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फरार सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याला भारत सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी (Terrorist) घोषित केले आहे. याआधी केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी घोषित केले असून, हे दोघेही कॅनडामध्ये लपले आहेत. गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये गोल्डी ब्रार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांच्या तस्करीतही त्यांचा सहभाग आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचा आरोप असलेला ब्रार कॅनडामध्ये लपला आहे. ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे सुमारे 13 गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या घरावर छापा टाकला होता. गोल्डी ब्रारच्या आधी 30 डिसेंबर म्हणजेच शनिवारी केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यांना दहशतवादी घोषित केले होते. दहशतवादी लखबीर सिंग लांडा हा पंजाबमधील आरपीजी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. यापूर्वी एनआयएने लांडावर 15 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील हरिके गावात राहणारा लखबीर सध्या कॅनडात लपला आहे.

देशातील सर्वात मोठा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे आणि गोल्डी ब्रार हा त्याचा चांगला मित्र असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर या व्यक्तीला बिश्नोई टोळीचा सर्वात विश्वासू माणूसही म्हटले जाते. गोल्डी ब्रारचा जन्म 1994 मध्ये झाला आणि त्याचे घर पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे होते. असे म्हटले जाते की, गोल्डीचे वडील पोलीस उपनिरीक्षक होते, आपल्या मुलाने शिक्षण घेऊन सक्षम व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण सतविंदर उर्फ ​​गोल्डीने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. (हेही वाचा: Ghaziabad Shocker: गाझियाबादमधील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या फलाटावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू; पत्नीची हत्या करून झाला होता फरार)

अहवालानुसार, गोल्डीचा चुलत भाऊ गुरलाल ब्रारचा खून झाल्यानंतर या हत्येचा बदला घेण्यासाठी गोल्डीने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. त्यावेळी गोल्डी गुंडांच्या संपर्कात आला आणि पुढे त्याची भेट जग्गू भगवानपुरिया आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी झाली. त्यानंतर गोल्डीने त्याच्या भावाच्या खुनाचा आरोप असलेले काँग्रेस नेते गुरलाल पहेलवान यांची हत्या केली. या हत्येनंतर गोल्डी स्टुडंट व्हिसावर कॅनडाला पळून गेला. सध्या तो कॅनडातील लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now