Golden Chariot Luxury Tourist Train: भारतीय रेल्वे सुरु करणार 'सुवर्ण रथ लक्झरी पर्यटक ट्रेन'; मिळणार 7 स्टार हॉटेलसारख्या सुविधा, पाहू शकाल कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाची झलक
ट्रेनमध्ये सलूनचीही खास व्यवस्था आहे. या लक्झरी ट्रेनमध्ये देशी-विदेशी खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी इथे दोन उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत
भारतीय रेल्वे (Indian Railways) आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) लक्झरी ट्रेन्सपैकी एक असलेली, सुवर्ण रथ लक्झरी टूरिस्ट ट्रेन (Golden Chariot Luxury Tourist Train) पुन्हा एकदा रुळांवर येण्यासाठी सज्ज आहे. कर्नाटकच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी सुवर्ण रथ लक्झरी पर्यटक ट्रेन यावेळी 14 डिसेंबर रोजी रवाना होत आहे. ट्रेनमध्ये 13 डबल बेड केबिन, 26 ट्विन बेड केबिन आणि 1 केबिन अपंग पाहुण्यांसाठी आहे. 40 केबिन असलेल्या या रॉयल ट्रेनमध्ये 80 प्रवासी प्रवास करू शकतात. या ट्रेनमध्ये प्रवाशांना शाही अनुभूती देण्यासाठी ट्रेनच्या सर्व आलिशान केबिनमध्ये एअर कंडिशनर आणि वाय-फाययुक्त आहेत.
सर्व केबिनमध्ये फर्निचर, आलिशान स्नानगृहे, आरामदायी बेड, आलिशान टीव्ही, ओटीटी अशा सेवांनी सुसज्ज आहेत. ट्रेनमध्ये सलूनचीही खास व्यवस्था आहे. या लक्झरी ट्रेनमध्ये देशी-विदेशी खाद्यपदार्थांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी इथे दोन उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत. या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ दिले जातील. यासोबतच बारमध्ये उत्तम आणि ब्रँडेड वाईन आणि बिअर उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या आरोग्यासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी, या गोल्डन रथ ट्रेनमध्ये आरोग्य स्पा देखील आहे, जिथे स्पा थेरपीसह अनेक स्पाचा आनंद घेता येईल. एवढेच नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक हायटेक जिमही आहे, जिथे वर्कआउटसाठी अतिशय आधुनिक व्यायाम मशीन आहेत. पाहुण्यांना चांगली सुरक्षा देण्यासाठी संपूर्ण ट्रेन सीसीटीव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म सिस्टमने सुसज्ज आहे. (हेही वाचा: Matheran Toy Train Resumes: प्रवाशांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू; जाणून घ्या वेळापत्र व तिकीट दर)
Golden Chariot Luxury Tourist Train:
या लक्झरी ट्रेनमध्ये 5 रात्री आणि 6 दिवस घालवण्यासाठी तुम्हाला 5 टक्के जीएसटीसह 4 लाख 530 रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये निवास, भोजन, मद्य, प्रवेश तिकीट, मार्गदर्शक इत्यादींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.goldenchariot.org ला भेट द्या किंवा तुमच्या शंका goldenchariot@irctc.com वर पाठवा. प्रवाशांना यंदा आणि पुढील वर्षी या ट्रेनद्वारे प्रवास करण्याची संधी प्राप्त होईल.