Gold Silver Rate Today: दसरा दोन दिवसांवर; सोन्या चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे दर

IBJA च्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 7483 प्रति ग्रॅम आहे तर चांदीचा दर हा प्रति किलो 88,290 रूपये आहे.

Photo Credit- X

भारतामध्ये सोन्याची किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज आरबीआय ने जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये पुन्हा सलग दहाव्या वेळेस कोणत्याच व्याजदरात बदल जाहीर करण्यात आलेला नाही. अमेरिकन बाजरातही सोन्याचे दर स्थिर असताना आज भारतात सोन्याचे दर थोडे कमी झाले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकांसाठी सोन्याचे दर कमी होणं ही दिलासादायक बाब आहे. 12 ऑक्टोबरला यंदा दसरा आहे त्यामुळे या सणाच्या दोन दिवस आधी हे सोन्याचे दर कमी होणं ही अनेकांना फायद्याची बाब आहे.

22 कॅरेट साठी आज प्रति ग्रॅम 7304 मोजावे लागणार आहेत तर 18 कॅरेट साठी 6062 रूपये मोजावे लागणार आहेत. हिंदू संस्कृती मध्ये साडेतीन मुहूर्तावर सोनं खरेदी शुभं मानलं जात असल्याने अनेक जण थोड्या फार प्रमाणात सोनं खरेदी करतातच. अशातच आता दसरा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सोन्यात घसरण होत असल्याने अनेक जण त्याच्या खरेदीसाठी गर्दी करू शकतात. Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण .

आजचा सोन्या-चांदीचा दर काय?

कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर 22 कॅरेट साठी 700 रूपयांनी, 24 कॅरेट साठी 760 रूपयांनी कमी झाले आहेत. आता सोनं केवळ दागिन्यांसाठी नव्हे तर सोन्याची खरेदी ही गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष सोनं किंवा बॉन्ड च्या स्वरूपात देखील सोनं खरेदी केली जाते.