Gold-Silver Price Today: दिवाळी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

चांदीमध्ये 2.41% घसरणीसोबत दर 56,342.66 रुपये प्रति किलोग्राम पाहायला मिळाला.

Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दिवाळी सणाच्या (Diwali Festival 2021) मुहूर्तावर अनेक लोक सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सहाजिकच सोन्याचे दर जाणून घेण्याबाबत उत्सुकता असते. सोने (Gold Price) बाजाराता दिवाळीपूर्वी काही दिवस काहीशी घसरण पाहायला मिळत होती. मात्र, दरवर्षीचा इतिहास पाहिला तर धनत्रयोदशीच्या आगोदरपासूनच सोने आणि चांदी (Silver Price) दरात वाढ होण्यास सुरुवात होते. मागणीही वाढत असते. मात्र, पाठिमागच्या काही दिवसांमध्ये डॉलर इंडेक्समध्ये वाढ पाहायला मिळत होती. त्यामुळे सोने काहीसे घसरले होते. बुधवारी (3 नोव्हेंबर) सकाळी सोना मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने .0.24% म्हणजेच 113 रुपयांनी घसरले होते. ही घसरण 47,509 रुपये इतकी होती. पाठिमागच्या सत्रातही हीपातळी 47,622 रुपये प्रति 10 ग्रॅमवर थांबली होती. त्यामुळे सरासरी दर 47,526 रुपये इतका पाहायला मिळाला. चांदीबाबत बोलायचे तर चांदीत 0.01% म्हणजेच 8 रुपयांची किरकोळ घसरण पाहायला मिळाली. प्रति किलोग्राम 63,215 रुपये इतका चांदीचा दर पाहायला मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने बाजाराबाबत GoldPrice.org ने दिलेल्या माहितीनुसार, 09.25 वर MCX वर सोन्यात 0.84% घसरण पाहायला मिळाली. चांदीमध्ये 2.41% घसरणीसोबत दर 56,342.66 रुपये प्रति किलोग्राम पाहायला मिळाला. (हेही वाचा, Petrol and Diesel Prices in India: सलग 7 दिवस इंधन दरवाढी नंतर आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड म्हणजेच IBJA ने दिलेल्या माहितीनुसार शेवटची अपडेट हाती आली तेव्हा सोने दर खालीलप्रमाणे होते. (सर्व दर Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आणि GST समाविष्ठ न करता दिले आहेत.)

देशातील प्रमुख शहरांतील सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली

22 कॅरेट- 45,650 रुपये

24 कॅरेट- 49,800 रुपये

मुंबई

22 कॅरेट- 46,860 रुपये

24 कॅरेट- 47,860 रुपये

कोलकाता

22 कॅरेट- 47,310 रुपये

24 कॅरेट- 50,110 रुपये

चेन्नई

22 कॅरेट- 44,820 रुपये

24 कॅरेट- 48,900 रुपये

दरम्यान, चांदी दराबाबत बोलायचे तर बेससाईट्सवर दिलेल्या माहितीनुसार चांदी प्रति किलो 63,200 रुपए दराने खरेदी विक्री केली जात आहे. दिल्लीत चांदी प्रति किलो 63,200 रुपए , मुंबई आणि कोलकाता शरहरांमध्येही चांदी 63,200 रुपए प्रति किलो आहे. तर, चेन्नई शहरात चांदी 67,600 रुपए प्रति किलो आहे.