Gold Rates Update: सोन्याच्या दराला झळाळी; पहा आजचा सोनं-चांदीचा दर काय?
तर चांदीचा दर प्रतिकिलो ₹74,100 आहे.
भारतामध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये (Gold Rates) वाढ नोंदवण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, Rate-Pause Decision च्या पार्श्वभूमीवर US Fed ची एक बैठक 13-14 जून दिवशी आयोजित करण्यात आली आहे. यामधील अनुमानांच्या पारर्श्वभूमीवर सोन्याचे दर वधारले आहेत. अमेरिकेत इन्फ्लेशन डेटा मध्ये Ease अपेक्षित आहे. त्याची देखील आज घोषणा होण्याची शक्यता आहे. या दोन आंतरराष्ट्रीय मोठ्या घडामोडींसोबतच भारतातही महागाई दर मागील 20 महिन्यातील निच्चांकावर आहे. त्याचा परिणामही सराफा बाजारावर झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्ट 2023 साठी Gold future contract ₹59,755 प्रति 10 ग्रॅम स्तरावर उघडला गेला आणि पहाटेच्या सौद्यांमध्ये ₹59,806 प्रति 10 ग्रॅम स्तरावर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव प्रति औंस $1,960 च्या आसपास आहे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)
त्याचप्रमाणे, चांदीचा दर आज ₹73,298 प्रति किलो स्तरावर उघडला आणि मंगळवारी कमोडिटी मार्केट उघडल्यानंतर काही मिनिटांतच ₹73,425 च्या इंट्राडे हाय वर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस 24.15 डॉलरच्या आसपास आहे. Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?
goodreturns.in च्या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 60,450 रूपये तोळा आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ₹74,100 आहे. दरम्यान सोन्याच्या वस्तू बनवण्यापासून सोनं खरेदी-विक्री करण्याचा दर प्रत्येक सराफा दुकानातही वेगवेगळा असतो. सोन्याचा दरावर दागिन्यांसाठी घडणावळ आणि टॅक्स देखील द्यावा लाग्तो. त्यामुळे प्रत्येक दुकानात आणि खरेदीवर सोन्याचे दर भारतभर वेगवेगळे असू शकतात. यंदाच्या लग्नसराईचा सध्या शेवटचा काळ आहे. पण आगामी सणवार पाहता भारतीयांच्या सोनं खरेदीला पसंती असते.