Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; पहा काय आहेत आजचे दर?
23 जून रोजी सोनाच्या दरात दोन महिन्यांमधील मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील परिणाम होत असतो.
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार दिसत आहे. 23 जून रोजी सोनाच्या दरात दोन महिन्यांमधील मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील परिणाम होत असतो. कालच्या तुलनेत आज सोन्याचे भाव काहीसे वाढले आहेत. IBJA च्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 4547 रुपये, 18 कॅरेटसाठी 3765 आणि 14 कॅरेटसाठी 3130 रुपये इतका आहे. हे रेट प्रति ग्रॅमनुसार देण्यात आले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 68348 रुपये इतका आहे. (Gold Rate Today: MCX वर आज सोन्याचा दर मागील 2 महिन्यातील निच्चांकी; पहा सोने, चांदीचा भाव काय?)
Good Returns च्या माहितीनुसार, आज मुंबई मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 46,200 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेटचा दर 47,290 इतका आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 47,200 रुपये प्रति तोळा इतका आहे. 22 कॅरेटचा 46,200 इतका आहे. नागपूर मध्ये 22 कॅरेटचा दर 46,200 रुपये असून 24 कॅरेटचा 47,200 रुपये प्रति तोळा इतका आहे. नाशिकमध्ये आजही नागपूर प्रमाणेच सोन्याचे दर आहेत.
IBJA Tweet:
सोन्याचे दर वाढले असले तरी आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. Good Returns वेबसाईटनुसार, काल मुंबईमध्ये चांदीचे दर 10 ग्रॅम चांदीचा दर 679 रुपये इतका होता. आज त्यात दोन रुपयांनी घट झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा दर 977 रुपये इतका आहे.
IBJA च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मिस कॉलद्वारेही तुम्ही आता सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्या.