Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; मुंबई, दिल्ली, कोलकाता सहित देशातील प्रमुख शहरात हे आहेत भाव
मुंबई मध्ये आज सोन्याचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर 41 हजार 656 रुपये इतके झाले आहेत तर दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), हैदराबाद (Hyderabad), चेन्नई (Chennai) सहित देशभरातील मुख्य शहरात सुद्धा सोन्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत
मागील काही काळात सोन्याच्या भावात (Gold Rate) सतत चढ उतार होत आहेत, काही तज्ज्ञांच्या मते हा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकटकाळ दूर झाल्यावर तर सोन्याच्या किमती 50 हजाराच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या भाववाढीची मागील दोन दिवसांपासून सुरवात झालेली दिसून येतेय, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबई मध्ये आज सोन्याचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर 41 हजार 656 रुपये इतके झाले आहेत तर दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), हैदराबाद (Hyderabad), चेन्नई (Chennai) सहित देशभरातील मुख्य शहरात सुद्धा सोन्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत. देशभरात चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे, आजचे प्रति किलो चांदीचे दर हे 39,574 रुपये आहेत. कोरोना मुळे जागतिक बाजारात आलेली मंदी पाहता सुरक्षित पर्याय म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दर्शवत आहेत, तुम्हीही असा विचार करत असाल तर आजचे मुंबई, दिल्ली, कोलाकाता सहित देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या..
देशातील प्रमुख शहरातील सोने दर
शहर 24 कॅरेट सोने 10 ग्राम 22 कॅरेट सोने 10 ग्राम
मुंबई 41,656 39,666
दिल्ली 42,559 40,537
कोलकाता 42,705 40,655
चेन्नई 41,573 39,590
हैदराबाद 41,522 39,556
(टीप- वरील दर हे Goldpriceindia.com या वेबसाईट वर प्राप्त हिताच्या आधारे देण्यात आल्या आहेत.)
गॅस सिलिंडर झाला स्वस्त ; जाणून घ्या नवी किंमत : Watch Video
दरम्यान, तज्ञांच्या अंदाजानुसार लॉक डाऊन संपताच लगेचच असणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.लवकरच सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या वर जाऊन प्रति 10 ग्रॅम 52 हजार इतक्या दरात सोने विकले जाऊ शकते.