IPL Auction 2025 Live

Gold Price: सोने दरात घसरण, आतापर्यंत 12 हजारांनी उतरले भाव; चांदीचीही स्थिती अशीच

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity Exchange) सोने दर 4% नी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजचा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 44,915 इतका आहे.

Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Gold Price: गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने दर आता काहीसे खाली उतरत आहेत. आताही हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत असे म्हणता येणार नाही. परंतू, सोने दर घसरण होत असल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळतो आहे. उच्चांकी दरापसून नजर टाकता आतापर्यंत साधारण 12 हजार रुपयांनी सोने दरात (प्रति 10 ग्रॅम) घसरण झाल्याचे पाहायला मिळते. आता एप्रिल महिन्यापासून लग्नसराई सुरु होते. त्यामुळे सोने दरातील ही घसरण अशीच कायम राहिल्यास सर्वसामान्यांना अधिक दिलासा मिळू शकणार आहे. चांदी दरही (Silver Rate) असेच काहीशी कामगिरी करत आहेत.

दरम्यान, चांदी (Gold-Silver) दर आज वधारताना दिसले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity Exchange) सोने दर 4% नी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजचा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 44,915 इतका आहे. चांदी दरातही (Silver Price) काहीशी अशीच स्थिती आहे. चांदी 0.6% वाढ होऊन प्रति किलॉग्रॅम 67,273 रुपयांवर पोहोचली आहे. (हेही वाचा, Pune: पुणेकरांचा नादच खुळा! लोकांच्या दाढ्या करण्यासाठी एका न्हाव्याने बनवला चक्क 8 तोळ्याचा सोन्याचा वस्तरा)

सोने चांदी दर ठळक नोंदी

शहर

सोने दर (प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली 48,180 रुपये
चेन्नई 46,170 रुपये,
मुंबई 44,880 रुपये
कोलकाता 46,950 रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी

अमेरिका 1,727.22 डॉलर (प्रति औस)

सोने चांदी दरातील चढउतार पाहता सोने आतापर्यंत 1200 रुपयांनी घसरले आहे तर चांदीही प्रति किलो 11000 रुपयांनी उतरली आहे.