Gold Price Today: मुंबईत सलग दुस-या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, काय आहे आजचा भाव

अशा स्थितीत आता दस-यानंतर सोन्याचे दर कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 49,960 रुपये इतकी आहे.

Gold | Representational Image | (Photo Credits: PTI)

दस-याच्या मुहूर्तावर सोन्याला चांगलीच झळाळी आलेली असताना दस-याच्या सलग दुस-या दिवशी ही झळाळी कमी झाली सोन्याच्या दरात (Gold Rate) घसरण झाली आहे. दस-याच्या दिवशी मुंबईत (Mumbai) 51,200 रुपये प्रतितोळा असलेल्या सोन्याचा दर आज कमी होऊन 50,960 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. दिवाळीपर्यंत सोने आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल (26 ऑक्टोबर) हा 51,050 रुपये प्रतितोळा इतका होता. ही घसरण ग्राहकांसाठी सुवार्ता असली तरीही दिवाळीत हा दर वाढण्याची शक्यता सांगण्यात आहे.

सणासुदीच्या काळाला सोन्याला चांगलाच भाव येतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अशा स्थितीत आता दस-यानंतर सोन्याचे दर कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 49,960 रुपये इतकी आहे.  Gold Rate on 26th October: दस-याच्या दुस-या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट, जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर

पाहूयात महत्त्वाच्या शहरातील आजचे सोन्याचे दर:

शहर 24 कॅरेट/प्रतितोळा 22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई 50,960 रुपये 49,960 रुपये
पुणे 50,960 रुपये 49,960 रुपये
चेन्नई 51,420 रुपये 47,240 रुपये
हैदराबाद 51,420 रुपये 47,240 रुपये
नवी दिल्ली 52,900 रुपये 49,410 रुपये
बंगळूरू 51,280 रुपये 47,010 रुपये
नागपूर 50,960 रुपये 49,960 रुपये
चंदिगड़  52,360 रुपये 48,810 रुपये

कोरोना व्हायरस मुळे सोन्याचे मध्यंतरीच्या काळात सोन्याचे दर चांगलेच कडाडले होते. कोविड-19 आणि लॉकडाऊन देशाला आर्थिक फटका बसला आहे. ती आर्थिक पोकळी भरून काढण्यासाठी सोन्याची खरेदी तसेच अन्य वस्तूंची खरेदी सणासुदीच्या काळात चांगली होणे अपेक्षित आहे. तसेच लग्नसराई देखील हळूहळू सुरु होत असल्याने काही दिवसांनी सोने बाजारात काय चित्र असेल हे काही दिवसांतच कळेल. एक मात्र सोन्याच्या किंमतीत कितीही चढ-उतार होत राहिले तरी सोन्याची आवड असणा-या ग्राहकांची गर्दी काही कमी होत नाही. कारण सोन्याची सर इतर कोणत्याही दागिन्याला येणार नाही हेही तितकेच खरे आहे.