Gold Rate Today: सोनं, चांदीचा आजचा दर काय? जाणून घ्या दिवाळी पूर्वी सध्या मुंबई, दिल्ली, कोलकत्ता मधील भाव

आजही सोन्याच्या दरात थोडी वाढ बघायला मिळाली आहे.

Gold | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. यामध्ये आगामी धनतेरस, लक्ष्मीपुजन आणि दिवाळी पाडवा पाहता सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं याला भारतीय पसंदी देतात. त्यामुळे तुम्ही देखील सोनं खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या सध्याचा बाजारामधील सोन्याचा, चांदीचा नेमका दर किती किती आहे? Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!

मुंबई मध्ये सोन्याचा दर हा प्रति तोळा अंदाजे 50,730 आहे. तर चांदीचा दर 62832 रूपये आहे. महाराष्ट्रात हा दर सारखाच आहे. पण भारताच्या अन्य ठिकाणी सोन्या-चांदीच्या दरात शहरागणिक बदल होऊ शकतो. तसेच हा भाव केवळ सोन्याचा आहे. दागिने घडवताना सराफा दुकानातील भाव वेगळा असतो. तसेच त्याची घडणावळ आणि टॅक्स याचा अधिकचा खर्च लक्षात घेऊन तुम्हांला एकून सोने खरेदीच्या खर्चाचा अंदाज बांधावा लागणार आहे. Sovereign Gold Bond Scheme: दिवाळी, धनतेरसच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या 8 व्या सीरीजला सुरूवात.

भारतामध्ये मुख्य शहरांमध्ये सोन्याचा दर

मुंबई - 50,730 प्रति तोळा

कोलकत्ता - 52530 प्रति तोळा

दिल्ली - 53,610 प्रति तोळा

भारतामध्ये सणाचा काळ पाहता आता पुढील काही दिवस हे दर चढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही सोन्याच्या दरात थोडी वाढ बघायला मिळाली आहे. भारतामध्ये सोन्याच्या दरामध्ये MCX हा 10 ग्राम सोन्यासाठी 50,460 आहे. तर चांदीमध्ये MCX हा 62,790 प्रतिकिलो इतका कायम आहे.