Gold Hallmarking: उद्यापासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य, जाणून घ्या बदललेल्या नियमांबद्दल अधिक

कारण उद्यापासून सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्गिंक असणे अनिवार्य असणार आहे. तर कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

Jewellery (Photo Credits: Pixabay)

Gold Hallmarking:  देशभरात उद्यापासून सोन्याचे दागिने खरेदी करण्याची पद्धत बदलली जाणार आहे. कारण उद्यापासून सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्गिंक असणे अनिवार्य असणार आहे. तर कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता तो सर्व दागिन्यांच्या व्यापाऱ्यांसाठी लागू असणार आहे. पण एखाद्या ज्वेलरकडून हॉलमार्क नसलेले दागिने विक्री केल्यास त्याला एका वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याचसोबत सोन्याच्या दागिन्याच्या किंमतीच्या पाच पट दंड त्याला ठोठावला जाऊ शकतो. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

पियुष गोयल यांनी असे म्हटले आहे की, 16 जून पासून दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य असणार आहे. मात्र हे टप्प्याटप्प्यानुसार असून सुरुवातीला 256 जिल्ह्यांसाठी लागू असेल. तसेच येत्या ऑगस्ट 2021 पर्यंत कोणतीही पेनल्टी लावली जाणार नाही असे ही पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.(7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ होण्याआधीच 'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट)

Tweet:

सोन्यावर हॉलमार्क हे त्याची शुद्धता दर्शवणारे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे आता सर्व ज्वेलर्सला फक्त 14, 18 आणि 22 कॅरेटचे सोने विक्री करण्यास परवानगी असणार आहे. BIS एप्रिल 2000 पासून गोल्ड हॉलमार्किंगची स्किम चालवत आहेत. सध्याच्या घडीला जवळजवळ 40 टक्के गोल्ड ज्वेलरी हॉलमार्किंग असणारीच आहे. ज्वेलर्ससाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुदअधा ऑनलाईन आणि ऑटोमॅटिक करण्यात आली आहे. World Gold Council च्या मते भारतात जवळजवळ 4 लाख ज्वेलर्सची संख्या आहे. त्यामधील 35,879 जण हे BIS सर्टिफाइड आहेत.

सरकारने गोल्ड हॉलमार्किंगचे नियम लागू करण्यासाठी एक कमेटी सुद्धा स्थापन केली आहे. याचे नेतृत्व ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे (BIS) चे निर्देशक जनरल प्रमोद तिवारी करणार आहेत. त्यांचे काम नियमात जे काही अडथळे येत आहेत ते दूर करणार आहेत.(आता वाहन परवानासाठी RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही; पहा काय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवा नियम)

दरम्यान, केंद्र सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये गोल्ड ज्वेलरी किंवा मुर्त्यांवर हॉलमार्किंग नियमांची घोषणा केली होती. हे नियम 2021 च्या जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ज्वेलर्सने या संदर्भात मुदत वाढवावा अशी मागणी केल्याने तारीख पुढे ढकलली. 1 जून पर्यंत गोल्ड हॉलमार्किंगची अंतिम तारीख 4 वेळा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर ती 15 जून केली होती. म्हणजेच एकूण 5 वेळा ही अंतिम तारीख पुढे ढकलली आहे.