Gold and Silver Rates: अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत 4,000 रुपयांपर्यंत घसरण; सीमाशुल्कात झाली 6% कपात
मंगळवारी या अर्थसंकल्पातील घोषणेपूर्वी एमसीएक्सवर सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंग दरम्यान, तो 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता आणि सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा होताच, तो वेगाने घसरायला लागला.
Gold and Silver Rates: मंगळवारी (23 जुलै) अर्थसंकल्प (Budget 2024) जाहीर झाल्यानंतर कमोडिटी मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये, सोने आणि चांदीवरील (Gold and Silver) मूळ कस्टम ड्युटी 4% कमी केली. आता सोने आणि चांदीवरील मूळ कस्टम ड्युटी 10% वरून 6% करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर सोन्याचा भाव चार हजार रुपयांनी घसरला. चांदीच्या दरात तीन हजार रुपयांहून अधिक घसरण झाली.
मंगळवारी या अर्थसंकल्पातील घोषणेपूर्वी एमसीएक्सवर सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंग दरम्यान, तो 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता आणि सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा होताच, तो वेगाने घसरायला लागला आणि 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. त्यानुसार अवघ्या काही तासांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 4,350 रुपयांनी कमी झाला. याआधी सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 72,718 रुपयांवर बंद झाला होता.
या काळात चांदीचा भाव घसरून 86,000 रुपयांच्या पातळीवर आला होता, मात्र, नंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 6 टक्के केली आहे. यामध्ये बेसिक कस्टम ड्युटी 5 टक्के, ॲग्री इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट सेस 1 टक्के आहे. (हेही वाचा: Budget 2024: कॅन्सरवरील 'ही' 3 औषधे होणार स्वस्त; अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीमधून देण्यात आली सूट)
याशिवाय प्लॅटिनमवरील शुल्क आता 6.4 टक्के करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार आयात केलेल्या दागिन्यांवर कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क कमी केल्याने सोन्याची मागणी वाढू शकते. सोने आणि चांदीवरील सध्याचे शुल्क 15% आहे, ज्यामध्ये 10% मूलभूत कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे.