Goa-Hyderabad SpiceJet Flight चं हैदराबाद मध्ये इमरजन्सी लॅन्डिंग; कॉकपीट मध्ये धूर

SG 3735 हे स्पाईस जेटचं विमान गोव्यावरून हैदराबाद कडे जात होते.

SpiceJet | (Photo Credits: Twitter/ANI)

SpiceJet फ्लाईटचं आज (13 ऑक्टोबर) हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट( Rajiv Gandhi International Airport) वर तातडीने लॅन्डिग करण्यात आलं आहे. विमान हवेत असताना अचानक पायलटला कॉकपीट मध्ये धूर दिसला. त्यानंतर या विमानाचं तातडीने लॅन्डिग झाल्याची माहिती डीजीसीए ने दिली आहे.

SG 3735 हे स्पाईस जेटचं विमान गोव्यावरून हैदराबाद कडे जात होते. लॅन्डिंगपुर्वी काही वेळ आधीच पायलटला धूर असल्याचं दिसलं. याप्रकरणी डीजीसीए ने अहवाल मागवला आहे. हे देखील नक्की वाचा: SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्याने विमान पुन्हा माघारी; प्रवासी सुरक्षित .

गोव्यावरून विमानाने सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी टेक ऑफ घेतले होते. हैदराबादला हे विमान 11 वाजून 30 मिनिटांनी लॅन्ड होणं अपेक्षित होते. लॅन्डिगच्या वेळेसच पायलटला धूर दिसला आणि त्याने एअर ट्राफिक कंट्रोलरला त्याची माहिती दिली. मग त्याने ग्राऊंड स्टाफला अलर्ट केले.

एअरक्राफ्टने सुरक्षित लॅन्डिग केले आहे. या विमानामध्ये 86 प्रवासी आहेत. केवळ एका प्रवाशाला विमानातून बाहेर पडताना छोटासा स्क्रॅच आल्याचं सांगण्यात आले आहे. या धूरामुळे प्रवासी काहीसे घाबरले होते. यानंतरची काही विमानं देखील डायव्हर्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये 6 डोमेस्टिक विमानं, 2 आंतरराष्ट्रीय विमानं आणि एक कार्गो फ्लाईटचा समावेश आहे.

एव्हिएशन रेग्युलेटर कडून स्पाईस जेट फ्लाईटवर 27 जुलैला 8 आठवड्यांसाठी बंदी घातली होती. स्पाईस जेटच्या विमानांमध्ये वारंवार सुरक्षेबाबत अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी ही बंदी घातली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif