Curfew In Goa: गोवा मध्ये 21 जून पर्यंत वाढवला कर्फ्यू; लग्नसोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी

गोवा (Goa) मध्ये वाढत्या कोरोना वायरस संक्रमणादरम्यान (Coronavirus Infection) आता सरकार कडून 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 ला रोखण्यासाठी कर्फ्यूचे नियम वाढवण्याचा निर्णय झाला आहे.

Goa CM Pramod Sawant (Photo Credits: ANI)

गोवा (Goa) मध्ये वाढत्या कोरोना वायरस संक्रमणादरम्यान (Coronavirus Infection) आता सरकार कडून 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 ला रोखण्यासाठी कर्फ्यूचे नियम वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी त्याबद्दलचे निर्णय जाहीर केला आहे. सरकारने कर्फ्यू (Curfew) वाढवला असला तरीही त्यामध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता 14 जूनला संपणारा कर्फ्यू पुढे वाढवण्यात आला आहे.

राज्यामध्ये आता दुकानं, पंचायत आणि म्युनिसिपल मार्केट आता सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेस खुली राहणार आहेत. तर लग्नाच्या सोहळ्यांमध्ये 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सरकारने यापूर्वीच मान्सूनसाठी अत्यावश्यक सामानाची विक्री करणार्‍या दुकानांना मोकळीक दिली होती. तसेच घर किंवा इमारतीच्या बांधणीसाठी आवश्यक टूल्सची विक्री करणारी दुकानं देखील खुली राहणार आहेत. Goa सरकारचा मोठा निर्णय; राज्यात चित्रपट व मालिकांच्या शुटींगला पूर्णतः बंदी, दिलेल्या सर्व परवानग्या केल्या रद्द.

गोव्यामध्ये काल 472 नवे रूग्ण समोर आल्याने राज्यातील केसलोड 1,62,048 पर्यंत वर गेला आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2914 कोविड मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. राज्यात सध्या 5057 अ‍ॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif