Goa Congress MLAs Join BJP: गोव्यात 'काँग्रेस फोडो' मोहीम यशस्वी, माजी मुख्यमंत्री Digambar Kamat यांच्यासह 8 आमदारांचा भाजप प्रवेश
गोवा काँग्रेस (Goa Congress) पक्षाच्या एकूण 11 पैकी 8 आमदारांनी आज सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप ( BJP) प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिंगबर कामत यांचा प्रमुख समावेश आहे.
गोव्यामध्ये भाजपची 'काँग्रेस फोडो' (Break the Congress) मोहीम यशस्वी झाली आहे. गोवा काँग्रेस (Goa Congress) पक्षाच्या एकूण 11 पैकी 8 आमदारांनी आज सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप ( BJP) प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिंगबर कामत यांचा प्रमुख समावेश आहे. काँग्रेस आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकूण 40 सदस्यांच्या विधानसभेत विरोधात असलेल्या काँग्रेसचे केवळ तीन आमदार शिल्लक (Congress Chhoro, BJP Ko Jodo) राहणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राज्य (गोवा) प्रमुख सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी (14 सप्टेंबर) पीटीआयला सांगितले की, काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जुलै 2019 मध्येही काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलिला लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे. या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Goa Congress: 'भारत जोडो'ला, 'काँग्रेस फोडो'ने प्रत्युत्तर; गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर, आजच पक्षप्रवेशाची शक्यता)
ट्विट
दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात काहीही झाले तरी आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही, अशी शपथ घेताना हे आमदार दिसत आहेत. लेटेस्टली मराठी या व्हिडिओंची पुष्टी करत नाही. गोव्यामध्ये मार्च 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर किनारपट्टीच्या राज्यात भाजपने सत्ता राखली. विधानसभेत भाजपचे 20 आमदार आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळ 11 वरून तीनवर कमी झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका बाजूला 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) काढत आहेत. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजप गोवा राज्यात 'काँग्रेस फोडो' मोहीम राबवत आहे.