GMCH Doctor Suspension Row: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्यमंत्री Vishwajit Rane यांचा आदेश रद्द; जीएमसीएच डॉक्टर डॉ रुद्रेश कुट्टीकर यांचे निलंबन मागे (Video)

Goa Government News: CM प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या वरिष्ठ जीएमसीएच डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचा निर्णय रद्द केला.

GMCH Doctor Suspension Row: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्यमंत्री Vishwajit Rane यांचा आदेश रद्द; जीएमसीएच डॉक्टर डॉ रुद्रेश कुट्टीकर यांचे निलंबन मागे (Video)
Vishwajit Rane | (Photo Credit- X)

Goa Health Departmen: राज्याच्या आरोग्यसेवा व्यवस्थेतील तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी रविवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांचा गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH) मधील एका वरिष्ठ डॉक्टरला निलंबित (GMCH Suspension Row) करण्याचा निर्णय मागे घेतला. मंत्र्यांच्या वर्तनावर वाढत्या सार्वजनिक आणि व्यावसायिक टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. “मी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे,” असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. “मी गोव्याच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केले जाणार नाही”, असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्यसेवेसाठी राज्य सरकारच्या अढळ वचनबद्धतेवर भर दिला आणि वैद्यकीय बंधुत्वाचे कौतुक केले. "आमचे डॉक्टर हे आपल्या आरोग्यसेवेचा कणा आहेत. समाजाप्रती त्यांचे समर्पण आणि सेवा आम्हाला महत्त्वाची वाटते," असे ते म्हणाले.

पत्रकाराच्या तक्रारीवरुन आदेश?

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रुग्णाप्रती 'अहंकारी वर्तन' असल्याचा आरोप करत जीएमसीएचचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर वाद सुरू झाला. एका ज्येष्ठ पत्रकाराने तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली, ज्यांनी दावा केला होता की सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी त्यांच्या सासूला कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये वैद्यकीय मदत नाकारण्यात आली. (हेही वाचा, Dog Ban in Goa: गोव्यात सरकार घालणार कुत्र्यांच्या काही प्रजातींवर बंदी; CM Pramod Sawant यांची घोषणा)

मंत्र्यांच्या आदेशावर टीका

विश्वजित राणे यांचा निर्णय अचानक भेटीदरम्यान रुग्णालयाची वैयक्तिक तपासणी करण्यावर आधारित होता. त्यावेळी रुग्णालयात गर्दी नसतानाही, तातडीच्या काळजीची गरज असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाशी झालेल्या गैरवर्तनाचा उल्लेख करून त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. दरम्यान, मंत्र्यांच्या पद्धती आणि स्वरावर व्यापक टीका झाली, विशेषतः इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि सोशल मीडियावरील नेटिझन्सकडून.

राणे यांच्याकडून तलवार म्यान

आदेशावर झालेली टीका, मुख्यमंत्र्यांची नाराजी आणि त्यांनी रद्द केलेले आदेश, या सर्व घडामोडींनंतर आरोग्यमंत्री राणे यांनी तलवार म्यान करत काहीशी नरमाईची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेदम्यान ते म्हणाले, मला आणखी चांगल्या शब्दांमध्ये व्यक्त होता आले असते. मी शक्यतो इतका चिडत नाही. तसेच, मी अशा प्रकारचा निर्णय इतक्या घाईगडबडीत घेण्याची आवश्यकता नव्हती. घडलेल्या सर्व प्रकारची मी जबाबदारी घेतो आणि अशा प्रकारचा संवाद माझ्याकडून पुन्हा होणार नाही, याची खात्री देतो. पुढे त्यांनी म्हटले की, ते रुग्णाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. "डॉक्टर समाजात एक उदात्त भूमिका बजावतात, परंतु कोणालाही उपचार नाकारता कामा नये. जेव्हा करुणा कमी असते तेव्हा हस्तक्षेप करणे हे माझे काम आहे,' असे ते पुढे म्हणाले.

काय घडले नेमके? (Video)

पणजीजवळील बांबोलीम येथे स्थित जीएमसीएच ही गोव्यातील एक प्रमुख सरकारी आरोग्य सेवा संस्था आहे जिथे 1,000 हून अधिक बेड आहेत आणि राज्य आणि शेजारच्या प्रदेशातील रुग्णांना सेवा दिली जाते.

निलंबन आदेश मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा एक संतुलित कृती म्हणून पाहिला जात आहे - जनता आणि रुग्णाच्या कुटुंबाने उपस्थित केलेल्या चिंता दूर करणे आणि त्याचबरोबर राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना संस्थात्मक पाठिंबा पुन्हा देणे. सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य प्रशासन आणि वैद्यकीय समुदायामध्ये सुसंवाद पुनर्संचयित करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 8529 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).