गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी

परंतू, त्यांच्या छातीत कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नाही. पर्रिकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रमोद गर्ग यांच्या हवाल्याने सावंत यांनी ही माहिती दिली.

Manohar Parrikar | (Photo credit: archived, edited, representative image)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Goa CM Manohar Parrikar) यांना रक्ताची उलटी झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पर्रिकर यांच्या प्रकृतिबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळावा यासाठी सरकारने त्यांच्या प्रकृतीबाबत मेडीकल बुलेटी जारी करवे अशी मागणी केली आहे. तर, गोवा सरकारचे प्रवक्ता प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे की, पर्रिकर यांना रक्ताची उलटी झाली आहे. परंतू, त्यांच्या छातीत कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नाही. पर्रिकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रमोद गर्ग यांच्या हवाल्याने सावंत यांनी ही माहिती दिली.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी सांगितले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या पर्रिकरांना मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. राणे यांनी सांगितले की, चाचण्यांचे सर्व निष्कर्ष पाहिले तर, वैद्यकीय परिमानानुसार पर्रिकर यांची प्रकृती उत्तम आहे. पुढील उपचारासाठी पर्रिकरांना दिल्लीला नेले जाण्याच्या वृत्ताचे राणे यांनी खंडण केले. ते म्हणाले मला वाटते की, मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. (हेही वाचा, राफेल प्रकरणात मनोहर पर्रिकर यांनी नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केले: पृथ्वीराज चव्हाण)

मनोहर पर्रिकर यांना गोवा येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याआगोदर मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ट्विट केले आहे की, माननीय मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर आहे.

गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे गेल्या वर्षभरापासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर अमेरिका, दिल्ली आणि मुंबई येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आला. ही उपचार प्रक्रिया अद्यापही सुरु आहे. प्रकृती नाजूक असतानाही मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असून, विधानसभेत उपस्थित राहण्यापासून ते मंत्रिमंडळ बैठक घेण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊनही काम करताना ते दिसत आहेत.

14 फेब्रुवारी 2018 पासून पर्रिकर आजारी आहेत. ते आजारी असल्याचे निदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे ते पुढील उपचारासाठी अमेरिकेला गेले.  गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला राजधानी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले.  पर्रिकर यांनी याच वर्षी (2019) 29 जानेवारीला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सहभाग नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच 31 जानेवारी रोजी पर्रिकर हे दिल्ली येथे उपचारासाठी गेले होते. 5 फेब्रुवारीला ते दिल्लीहून गोव्याला परतले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif