वडिलांना झाडाला बांधून मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 नराधमांचे कृत्य

त्यांनी वडिलांना शस्त्राचा धाक दाखवत आणि बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. त्यांनंतर असाय अवस्थेतील वडिलांना त्यांनी झाडाला बांधले. झाडाला बांधलेल्या वडिलांसमोरच नराधमांनी पीडितेवर बलात्कार केला.

Gang Rape in Bihar | (Photo credit: archived, edited, representative image)

बिहार येथील गुंडाराज व्यवस्थेतील विकृती दाखवणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. बिहार राज्यातील (Bihar) किशनगंज (Kishanganj)येथे सहा नराधमांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. अत्याचार करताना नराधमांनी विकृतीचे टोक गाठले. नराधमांनी पीडितेच्या वडीलांना झाडाला बांधले आणि त्यांच्यासमोरच (वडिलांच्या) पीडितेवर बलात्कार केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. पीडितेच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले की, रात्रीच्या वेळी या सहा नराधमांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने दरवाजा ठोठवला.

दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी पाणी देण्यासाठी दरवाजा उघडताच हे नराधम घरात घुसले. त्यांनी वडिलांना शस्त्राचा धाक दाखवत आणि बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. त्यांनंतर असाय अवस्थेतील वडिलांना त्यांनी झाडाला बांधले. झाडाला बांधलेल्या वडिलांसमोरच नराधमांनी पीडितेवर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडितेचे कुटुंबिय ही घटना घडलेल्या गावात काही दिवसांपूर्वीच राहायला आले होते.

पीडिता आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी साह आरोपींवर गुन्हा दाखल केले आहे. सर्व आरोपी या गावातीलच असून, त्यांनी पीडितेच्या वडीलांना पोलिसांन सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीह दिली आहे. याबाबत पोलीस तक्रारीतही तशी नोंद आहे.  (हेही वाचा, हस्तमैथुन करत दाबायचा गळा, ९०जणाचे घेतले प्राण; सीरियल किलर पोलिसांच्या ताब्यात)

प्राप्त माहितीनुसार, फैज आलम, अब्दुल मन्नान, कालू, कासिम, तकसीर आणि अन्सार अशी काही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आरोपींपैकी दोन युवक हे इलेक्ट्रीक मॅकेनिक (Electrician) म्हणून काम करतात. या दोघांनीच पाणी पिण्याचे निमित्त करुन पीडितेच्या कुटुंबीयांना दरवाजा उघडण्यास सांगितले होते. स्थानिक एसपी कुमार आशीष यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक केले जाईल. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असून, अहवाल येणे बाकी आहे.