Jagannath Rath Yatra 2025: गौतम अदानी पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणार; यात्रेकरूंसाठी सुरू केली प्रसाद सेवा
गौतम अदानी त्यांच्या कुटुंबासह जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी दोन दिवस पुरीमध्ये राहणार आहेत. अदानी समूहाने पुरी धाममध्ये 'प्रसाद सेवा' सुरू केली आहे. अदानी समूहाने 'सेवा ही साधना है' या मंत्राचा अवलंब करून लाखो यात्रेकरूंना मोफत जेवण आणि सुविधा पुरवल्या आहेत.
Jagannath Rath Yatra 2025: भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशात रथयात्रेला विशेष स्थान आहे. दरवर्षी, ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आज ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेत (Puri Jagannath Rath Yatra 2025) सहभागी होणार आहेत. गौतम अदानी त्यांच्या कुटुंबासह जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी दोन दिवस पुरीमध्ये राहणार आहेत. अदानी समूहाने पुरी धाममध्ये 'प्रसाद सेवा' सुरू केली आहे. अदानी समूहाने 'सेवा ही साधना है' या मंत्राचा अवलंब करून लाखो यात्रेकरूंना मोफत जेवण आणि सुविधा पुरवल्या आहेत.
प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ 2025 मध्ये, अदानी ग्रुपने मोठ्या संख्येने भाविकांना मोफत जेवण दिले होते. हा उपक्रम भक्ती, सेवा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण होता. आता पुरीच्या रथयात्रेतही तीच सेवा पुनरावृत्ती होत आहे, ज्यामध्ये केवळ अन्नच नाही तर स्वच्छता, पाणी आणि मूलभूत गरजांची काळजी घेतली जात आहे. (हेही वाचा - Jagannath Puri Rath Yatra 2025: जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देत द्विगुणित करा आनंद)
नऊ दिवसांची रथयात्रा -
26 जून ते 8 जुलै 2025 पर्यंत पुरीची रथयात्रा आयोजित केली जात आहे. हे नऊ दिवस भगवान जगन्नाथाच्या भक्तांसाठी सर्वात पवित्र दिवस मानले जातात. या दरम्यान, देशभरातून लाखो लोक पुरी येथे येतात आणि भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्याचे व रथ ओढण्याचा सौभाग्य मिळवतात. या दरम्यान, भाविक भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांचे भव्य रथ गुंडीचा मंदिरात ओढतात. जिथे देवता एक आठवडा राहते आणि नंतर जगन्नाथ मंदिरात परत येते. (हेही वाचा - Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ यात्रेत किती रथ असतात? हे रथ कोण बनवते? जाणून घ्या संपूर्ण)
रथयात्रेत 10 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात -
या कार्यक्रमासाठी पुरीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या आठ कंपन्यांसह सुमारे 10 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

