Hindenburg Impact On Adani Group: हिंडनबर्ग रिपोर्टचा झटका, अदानी समूह धक्क्याला; एका दिवसात 100 अब्ज डॉलरचे नुकसान
अदानी समूहाचे समभाग बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) मध्ये सर्वाधिक फायदा मिळवून देणारे शेअर म्हणून ओळखले जात होते. आता मात्र, सर्वाधिक तोटा देणारे समभाग अशी या कंपन्यांच्या शेअर्सची ओळख ठरते आहे.
Adani Group Losses in 100 Billion: गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 यादीतून बहेर पडल्यावर त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहातील कंपन्यांना भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) आज 100 ऑब्ज डॉलर्स इतके प्रचंड नुकसान झाले. अदानी समूहाचे समभाग बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) मध्ये सर्वाधिक फायदा मिळवून देणारे शेअर म्हणून ओळखले जात होते. आता मात्र, सर्वाधिक तोटा देणारे समभाग अशी या कंपन्यांच्या शेअर्सची ओळख ठरते आहे. हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) संस्थेच्या अहवालानंतर ही धक्कादायक उलथापालथ होत आहे.
गुंतवणूकदारांना पावलोपावली नुकसान
अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग शेअर बाजार सुरु झाल्यापासून प्रत्येक मनिटीला कोसळत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक पावलावर नुकसान सहन करावे लागत आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळत असल्याचे लक्षात येताच गौतम अदानी यांचे नेतृत्व असलेल्या समूहाने बाजारात विक्रीसठी उतरविणाऱ्या 2.5 बिलियन डॉलर शेअर्सची विक्री पूर्णपणे थांबवली आहे. ज्यामुळे पाठिमागील आठवड्याच्या शॉर्ट सेलर धक्क्यानंतर ग्रूपचे बाजारातील भांडवल 100 बिलीयन डॉलर इतके झाले. (हेही वाचा, Adani Group And Hindenburg Research: हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाचा अदानी साम्राज्याला धक्का; कायदेशीर कारवाईची शक्यता, शेअर बाजारातही खळबळ)
गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप टेन यादीतूनही बाहेर
वाचकांच्या माहितीसाठी असे की, गौतम अदानी हे आता जगभरातील सर्वात श्रीमंतांच्या टॉप टेन यादीतून बाहेर पडले असून सध्या ते 15 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरुन त्यांची घसरण 15 क्रामांकावर गेली आहे. फोर्ब्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय उद्योजक मुकेश अंबानी 83.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संपत्तीसह यादीत 9व्या स्थानावर आहेत. अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलरची वाढ झाली. मात्र गेल्या आठवड्यापासून त्यात मोठी घसरण झाली आहे.
अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची घसरण
अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड - 2020.00 -108.70 (-5.11%)
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. - -469.55 -22.60%
अदानी पॉवर लि. -202.15 -10.60 (-4.98%)
अदानी ट्रान्समिशन लिमिटेड -1557.25 -173.00
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड -1038.05 -115.30 (-10.00%)
अदानी टोटल गॅस लिमिटेड - 1711.50 -190.15 (-10.00%)
अदानी विल्मार लिमिटेड- 421.45 -22.15 (-4.99%)
हिंडेनबर्ग रिसर्च काय म्हणते?
गौतम अदानी आणि त्यांचा समूह कृत्रिमरित्या फुगवटा दाखवून संपत्तीमध्ये अनैसर्गिक वाढ करत आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा बोजा त्यांच्या एकूण संपत्ती आणि कंपन्यांच्या उत्पादनापेक्षा अधिक आहे, असा दावा हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने केला. त्यानंतर अदानी सम्राज्याला एकप्रकारे ओहोटीच लागली. अदानी समूहाच्या कंपन्यांना गेल्या आठवडाभरात 90 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.