Gas Leak in Gujarat: गुजरात येथील सूरत गॅस गळती दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, 20 अत्यावस्त

या दूर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीरीत्या अत्यावस्त आणि जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

Gas Leak in Gujarat | (Photo Credit - ANI)

Chemical tanker leaks in Surat: गुजरात (Gujarat) राज्यातील सुरत (Surat) येथे गुरुवारी (6 जानेवारी) गॅस गळती होऊन मोठी दुर्घटना घडली. या दूर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीरीत्या अत्यावस्त आणि जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे प्रभारी ओंकार चौधरी यांचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे की, ही घटना सचिन जीआयडीसी (Sachin GIDC Area ) परिसरातील विश्व प्रेम डाइंग अँड प्रिंटिंग मील मध्ये घडली. अत्यावस्त असलेल्या सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गॅस लीक झाल्यानंतर परिसरात जोरदार धावपळ उडाली. तसेच, नागरिकांना काहीही लक्षात न आल्याने लोग घाबरेघुबरे झाले. दरम्यानच्या काळात गॅस परिसरात पसरला आणि लोकांचा श्वास गुदमरल्याने काहीचा मृत्यू झाला. सुरुवातीला अगदीच किरकोळ असलेली ही घटना पाहता पाहता मोठ्या दुर्घटनेत बदलली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस अजूनही या भागात मदत आणि बचाव कार्य करत आहेत. टँकर चालक प्रिंटिंग मिलजवळील नाल्यात रसायन टाकत असताना अपघाती गॅस गळती झाली. काय घडत आहे हे आजूबाजूच्या लोकांना समजले. मात्र तोपर्यंत, विषारी वायू आधीच उघड्या आउटलेटमधून पसरला होता. या विषारी वायुने अवघ्या काही क्षणांत पाच लोकांचा जीव घेतला. काहीच वेळात असे सांगण्यात आले की गॅस गळतीच्या घटनेत आणखी एका व्यक्तीचाही अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहावर पोहोचली. . (हेही वाचा, छत्तीसगढ़: रायगढ येथील पेपर मिल मधून गॅस गळती, 7 कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल; 3 जणांची प्रकृती गंभीर)

ट्विट

घटनेची माहिती कळताच सुरत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि उर्वरित जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आवश्यक पावले उचलली.