Gas Cylinder Price: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात विधानसभा निवडणूकीनंतर आणि रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे होणार भरघोस वाढ

कारण सातत्याने होणारा तोटा पाहता तेल कंपन्यांनी पाच राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीनंतर एलपीजीच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.

Gas Cylinder (Photo Credits: All India Radio News, Facebook)

Gas Cylinder Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर सामान्य माणसांना आणखी एक झटका बसणार आहे तो म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींचा. कारण सातत्याने होणारा तोटा पाहता तेल कंपन्यांनी पाच राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीनंतर एलपीजीच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. तर कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ झाली आहे.

खरंतर रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिंलिंडरच्या किंमती वाढवल्या. त्यानंतर आता त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. आता पाच किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 27 रुपयांनी वाढले. अशातच असे मानले जात आहे की, पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर घरगुती गॅस सिलिंडरसह पेट्रोल-डिझेलचे दर ही वाढू शकतात.(Today Oil Rate Update: बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ, ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $118वर)

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या 119 दिवसात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलवर 5 आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी सुद्धा आपला टॅक्स कमी केला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 82 डॉलर प्रति बॅरल होत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 104 डॉलरच्या पार पोहचले आहेत.

जर तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या ताज्या किंमतीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यासाठी https://iocl.com/Products/IndaneGas.aspx  येथे क्लिक करा. प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती जाहीर केल्या जातात.