Suresh Pujari Arrested: अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याला फिलीपीन्समध्ये अटक; Philippines Fugitive Search Unit ची कारवाई

फिलीपीन्स (Philippines) पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या मागावर होते. अखेर फिलीपीन्स पोलिसांनी का होईना राजू पुजारी याच्या मुसक्या आवळल्या

Suresh Pujari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई अंडरवर्ल्ड (Mumbai Underworld) विश्वातला आणखी एक चर्चीत चेहरा गँगस्टर सुरेश पुजारी (Suresh Pujari) अखेर पोलिसाच्या जाळ्यात अडकला आहे. फिलीपीन्स (Philippines) पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पाठिमागील अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या मागावर होते. मात्र, तो देशाबाहेर पसार होण्यात यशस्वी झाला होता. अखेर फिलीपीन्स पोलिसांनी का होईना राजू पुजारी याच्या मुसक्या आवळल्या ( Suresh Pujari Arrested) आहेत. सुरेश पुजारी याच्यावर तब्बल 24 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 2007 मध्ये सुरेश पुजारी देश सोडून फरार झाला होता. सुरेश पुजारी याच्यावर इंटरपोल द्वारा (Interpol) नजर ठेवली जात होती.

महाराष्ट्रात विविध प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहेत. खंडणी, हत्या, गोळीबर अशा एक ना अनेक गुन्ह्यांमध्ये तो महाराष्ट्र पोलिसांना हवा होता. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पुजारी याला 15 ऑक्टोबरलाच पकडण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआय पाठिमागील अनेक वर्षांपासून त्याच्यावर बारीक नजर ठेऊन होते. पुजारी याला फिलीपीन्सच्या ‘फ्यूजीटिव सर्च यूनिट’ (Philippines Fugitive Search Unit) ने अटक केली. (हेही वाचा, Ravi Pujari in Mumbai Police Custody: रवी पुजारी याचा ताबा मुंबई पोलिसांकडे, अनेक गुन्ह्यांची होणार उकल)

सुरेश पुजारी याने कुख्यात गुंड रवि पुजारी (Ravi Pujari) याच्यासोबत गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. मात्र, व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा. गुन्हेगारी वर्तुळात स्वत:चे वर्चस्व प्रस्तापीत करण्याची झालेली घाई आणि पैशावरुन मतभेद आदी कारणांवर तो रावी पुजारी याच्यापासून वेगळा झाला. त्यानंतर त्याने आपली स्वत:ची वेगळी गँग बनवली. बिल्डर, उद्योगपती, सेलिब्रेटी यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी गोळा करणे, हत्या आणि कट रचने असे उद्योग त्याने सुरु केले. मुंबई क्राईम ब्रांचमधील सूत्रांच्या माहितीनुसार पाठिमागील 2 ते तीन दिवसांपूर्वीच सुरेश पुजारी याला अटक झाली आहे. त्याच्याशी संबंधीत अनेक तपशील मुंबई पोलिसांनी भारत सरकारला दिले आहेत. सुरेश पुजारी याच्यावर इंटरपोल द्वारा (Interpol) नजर ठेवली जात होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. लवकरच त्याचे भारतात प्रत्यार्पण केले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif