Gang Rape in a Moving Car: आगरा येथे चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांत तक्रार दाखल
प्रवासादरम्यान तीन तरुणांनी टॅक्सीत प्रवेश केला. याच तरुणांनी तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला.
Agra Gang Rape in a Moving Car: चालत्या कारमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुढे येत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रीरीनंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेने दिलेल्या पोलीस तत्कारीत म्हटले आहे की, तिने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडाहून (Noida) सामायिक टॅक्सी घेतली. प्रवासादरम्यान तीन तरुणांनी टॅक्सीत प्रवेश केला. याच तरुणांनी तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला एतमादपूर (Etmadpur ) येथे सोडून आरोपी पळून गेले.
पीडितेने एतमादपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. एतमादपूर पोलिसांनी सदर घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. (हेही वाचा, Pune Gang Rape: पुणे येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहा जण पोलिसांच्या ताब्यात)
ट्विट
आगऱ्याचे सीपी प्रीतींदर सिंग यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनायने केलेल्या ट्विटनुसार, पीडितेवर कथीतरित्या अत्याचार झालेली कार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली आहे. संशयीत कारमधून प्रवास करणाऱ्या तीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. ज्यांच्यावर पीडितेवर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे.