Gang Rape With Pregnant Woman: गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करुन जीवंत जाळले; मध्य प्रदेश राज्यातील मुरैना येथील घटना

पीडितेच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, तिची प्रकृती गंभीर आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गर्भवती महिलेवर (Pregnant Woman) सामुहीक बलात्कार (Gang Rape) करुन तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील मुरैना (Morena ) येथे घडली आहे. पीडितेच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, तिची प्रकृती गंभीर आहे. पीडिता जवळास 80% भाजली आहे. तिला ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना अंबागावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदका पूरा गावात घडली. तिच्यावर तीन पुरुषांनी अत्याचार केला.

बलात्कार करुन पेटवले

अंबा पोलीस ठाण्याचे प्रमुख अलोक परिहार यांनी दिलेल्या माहतीनुसार, पीडिता एका महिलेसोबत गावात चर्चा करण्याच्या उद्देशाने गेली होती. सदर महिलेच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता. दरम्यान, तिच्यावरच  बलात्कार करण्यात आला. पीडिता ज्या महिलेच्या घरी गेली त्याच महिलेच्या पतीसह आणखी तिघांनी त्याच महिलेच्या घरी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेवर  लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्यावर इंधन ओतून तिला पेटवून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Kerala Man 133 Years Jail: केरळमधील 42 वर्षीय व्यक्तीस 133 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या कारण)

घटनेचा व्हिडिओ पोलिसांना प्राप्त

मध्य प्रदेश पोलिसांना एक व्हिडिओ प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये पीडिता तिच्यासोबत घडलेली घटना सांगताना ऐकू येते. तीन पुरुषांनी तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला आणि त्यानंतर तिला पेटवून दिल्याचे पीडिता सांगत असल्याचे व्हिडिओत ऐकू येते. लेटेस्टली मराठी कथीत व्हिडिओची पुष्टी करत नाही. बलात्काराच्या आरोपाखाली जामीनावर बाहेर असलेल्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, हा व्यक्तीच पीडितेचा पती आहे, असेही ते म्हणाले. पीडितेने दंडाधिकाऱ्यांकडे तीचा जबाब नोंदवला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप त्याची नोंद केली नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, Shocking! पुण्यात अल्पवयीन मुलीवर भाऊ आणि वडिलांकडून 5 वर्षे बलात्कार; आजोबा व काकांनी केला विनयभंग)

महिलांवरील अत्याचार हा नेहमीच सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरामध्ये महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि सामुहीक बलात्कार हा चिंतेचा विषय आहे. असे प्रकार कमी करण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी जागतीक पातळीवर प्रयत्न केले जातात. असे असले तरी अजून तरी त्यात कोणत्याच देशाला फारसे यश आले नाही. भारतासारख्या देशात तर महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. परिणामी अनेकदा महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंदही घेतली जात नाही. त्यामुळे अशा प्रकरणांना अनेकदा वाचाही फुटत नाही. अलिकडील काही वर्षांमध्येय महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे त्या आपल्या अधिकारांप्रती थोड्याफार सजग झाल्या आहेत. तरी देखील शिक्षित वर्गातही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण बरेच असल्याचे विविध अहवालांतून पुढे आल्याचे पाहायला मिळते.