G7 summit 2020: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला निमंत्रण, चीन अस्वस्थ

ज्यात कॅनडा (Canada), फ्रान्स (France), जर्मनी (Germany), इटली (Italy), जपान (Japan), युनाटेड किंग्डम (United Kingdom) आणि यूनायटेड स्टेट्स (United States) या देशांचा समावेश आहे.

G7 summit 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा झाली. चर्चेदरम्यान, अमेरिकेने भारताला जी-7 (G7 Summit) परिषदेचे निमंत्रण दिले. जे भारताने स्वीकारले. मात्र, जी-7 मध्ये भारताला निमंत्रण दिल्याचे शेजारी राष्ट्र चीनला मात्र फारसे आवडले नाही. त्यामुळे या निमंत्रणावरुन चीन काहीसा अस्वस्थ झाला आहे. चीनने भारताला मिळालेल्या निमंत्रणाबाबत कडवट प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, बीजिंगविरुद्ध गट करुन कोणतीही कारवाई करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील.

जी-7 हा जगभरातील शक्तीशाली राष्ट्रांचा एक समूह आहे. ज्यात कॅनडा (Canada), फ्रान्स (France), जर्मनी (Germany), इटली (Italy), जपान (Japan), युनाटेड किंग्डम (United Kingdom) आणि यूनायटेड स्टेट्स (United States) या देशांचा समावेश आहे. (हेही वाचा, George Floyd Death: अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लष्कर उतरवू, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा)

अमेरिका राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला होणारी जी-7 राष्ट्रांची बैठक सप्टेंबर पर्यंत स्थगित केली आहे. तसेच, भविष्यात चीनला रोखण्यासाठी एक योजना तयार करण्यासाठी भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाला आमंत्रित केले आहे. कोरोना व्हायरस संकटानंतर अमेरिका आणि चीन यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. हा व्हायरस चीनमधील वुहान शहरात जन्माला आला होता.

भारत आणि चीन यांच्यात लद्दाक सीमेवरुन सुरु असलेल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-भारत यांच्यात झालेल्या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे. या आधी अमेरिकेने भारत-चीन यांच्यात सुरु असलेल्या ताणतणाववर मार्ग काढण्यासाठी मध्यस्थाची मदत घ्यावी असे म्हटले होते. मात्र, अमेरिकेच्या या मतावर तेव्हा भारत अथवा चीन यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती.