Free Flight Cancellation: नवीन वर्षानिमित्त एअरलान्स कडून खास गिफ्ट! आता विनामुल्य करा फ्लाईट कॅन्सल किंवा रिशेड्युल
एअर इंडियाने 'फॉगकेअर' नावाची सर्व्हिस सुरू केली आहे.
तुम्ही विमान प्रवास करण्याचा प्लान करत आहात किंवा आधीच तिकीट बुक केलं असुन ट्रीप प्लान केली आहे. तरी एअर इंडियाकडून आता तुम्हाला विमान तिकीट बुकींगवर भन्नाट ऑफर दिली जाणार आहे. पण एअर इंडियाकडून देण्यात येणारी ही ऑफर केवळ एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी आहे. इतर कुठल्याही एअर लाइन्ससाठी नाही. तर नवीन वर्ष आणि ख्रिसमसचा मुहूर्त साधत एअर इंडियाकडून या भन्नाट ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. तरी एअर इंडियाच्या या नव्या सर्विसनुसार प्रवाशांना विनामुल्य प्लाईट कॅन्सल किंवा रिशेड्युल करता येणार आहे. एअर इंडियाने 'फॉगकेअर' (Air India FogCare Service) नावाची सर्व्हिस सुरू केली आहे. एअर इंडियाने (Air India) सुरू केलेल्या या नव्या सर्व्हिस अंतर्गत प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
एअर इंडियाने (Air India) हिवाळ्यात धुक्यामुळे फ्लाइट उड्डाण करण्यास होणार उशीर आणि रद्द केल्यामुळे प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेऊन "फॉगकेअर" (Air India FogCare Service) सुरू केले आहे. ज्या अंतर्गत एअर इंडिया ग्राहकांना धुक्यामुळे प्रभावित होणारी फ्लाइट कोणतेही अतिरिक्त भाडे न घेता फ्लाईट विनामुल्य कॅन्सल अथवा रिशेड्यूल करण्याचा पर्याय देण्यात येईल. (हे ही वाचा:- Indigo Flight Cancel: इंडिगो एअरलाइन्सची 20% उड्डाण सेवा रद्द, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय)
हिवाळ्यात दाट धुक्यांमुळे दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये दृश्यमानता कमी होते. अशा परिस्थितीत अनेकवेळा विमान उशीर उड्डाण करतात किंवा रद्द केले जातात. तरी प्रशांसासाठी ही मोठी दिलासादायक बातमी असुन आता फ्लाईट कॅन्सल किंवा रिशेड्युल करताना प्रवाशांचे पैसे वाचणार आहेत. एअर इंडियाकडून नव्याने सुरु करण्यात आलेली ही अगदी भन्नाट सर्विस आहे.