Free Dish TV: खुशखबर! आता मोफत धान्यानंतर सरकार देणार फ्री डिश टीव्ही, जाणून घ्या सविस्तर
यासोबतच जुने ट्रान्समीटरही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एफएम ट्रान्समीटर बसवणार असल्याचे सरकारने सांगितले आणि जुने ट्रान्समीटर अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. अल्पदरात घरे दिली जात आहे, मोफत धान्य पुरवले जात आहे. त्यानंतर आता लोकांना डिश टीव्ही (DD Free Dish) मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दूरदर्शन (DD) आणि आकाशवाणीची (AIR) स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.
प्रसार भारती म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ आणि आणि दूरदर्शनच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2,539.61 कोटी खर्चाच्या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या ‘ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट’ (BIND) च्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. प्रसार भारतीने कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य संदेश आणि जनजागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याद्वारे देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे. या योजनेद्वारे डीटीएचचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. यासोबतच जुनी स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आखली जात आहे.
सध्या जवळपास 36 टीव्ही चॅनेल्स दूरदर्शनच्या अंतर्गत येतात. यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत. आकाशवाणीकडे सध्या सुमारे 500 प्रसारण केंद्रे आहेत. सरकारच्या निर्णयामुळे देशातील रोजगारालाही चालना मिळेल, असे सरकारने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यासह, कंटेंटचा दर्जा देखील सुधारला जाईल. देशभरात डीडी फ्री डिशचा विस्तार करण्याच्या प्रकल्पामुळे डीडी फ्री डिश डीटीएच बॉक्सेसच्या निर्मितीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: FD Rate Hike: या बँकेने वाढवले FD वर व्याजदर; गुंतवणूकदार होणार मालामाल; जाणून घ्या किती होणार फायदा)
दूरदर्शनमध्ये मोठ्या बदलांसोबतच सरकार व्हिडिओचा दर्जाही सुधारणार आहे. यासोबतच जुने ट्रान्समीटरही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एफएम ट्रान्समीटर बसवणार असल्याचे सरकारने सांगितले आणि जुने ट्रान्समीटर अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.