भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची 10 ऑगस्टला ब्रेन सर्जरी झाली होती तेव्हापासून प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. आज 19 दिवस उलटून गेले असून आज त्यांच्या तब्येतीविषयी थोडीशी आशादायी बातमी समोर आली आहे. प्रणब मुखर्जी यांच्या Renal Parameters मध्ये सुधारणा झाली असून अजूनही फुफ्फुसांच्या संसर्गावर दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात (Army Hospital, Delhi) उपचार घेत आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची हेमोडायनामिक स्थिती स्थिर असून अजूनही ते कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते व्हेंटिलेटरवरच वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली इलाज घेत आहेत.
गेले 19 दिवस प्रणब मुखर्जी दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नव्हती. मात्र आज त्यांच्या Renal Parameters मध्ये सुधारणा झाल्याचे ऐकून त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
हेदेखील वाचा- Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजुन कोमातच; Renal Parameters मध्ये कालपासुन अस्थिरता
Former President Pranab Mukherjee (in file pic) is being treated for lung infection. His renal parameters have improved. He continues to be in deep coma and on ventilator support. He remains haemodynamically stable: Army Hospital (R&R), Delhi Cantonment pic.twitter.com/a2T9qc24YG
— ANI (@ANI) August 29, 2020
दरम्यान मध्यंतरी एका प्रसिद्ध पत्रकाराने प्रणब मुखर्जी यांच्या निधनाचे ट्विट सुद्धा केले होते ज्यानंतर बराच गोंधळ झाला होता. मात्र प्रणब यांचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी यांचे आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात, त्यांनीच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.