Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजुन कोमातच; Renal Parameters मध्ये कालपासुन अस्थिरता

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंच्या प्रकृतीबाबत दिल्ली च्या आर्मी हॉस्पिटल मधुन अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रणब मुखर्जी हे अजुनही कोमात आहेत आणि त्यांंच्यावर व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत, मात्र कालपासुन मुखर्जी यांंचे रेनल पॅरामीटर्स हे अस्थिर झाल्याचे समजत आहे.

Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजुन कोमातच; Renal Parameters मध्ये कालपासुन अस्थिरता
File Image Of Pranab Mukherjee | Photo Credits: Twitter/ ANI

Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंच्या प्रकृतीबाबत दिल्ली च्या आर्मी हॉस्पिटल मधुन अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रणब मुखर्जी हे अजुनही कोमात आहेत आणि त्यांंच्यावर व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत, मात्र कालपासुन मुखर्जी यांंचे रेनल पॅरामीटर्स हे अस्थिर झाल्याचे समजत आहे. हे पॅरामीटर्स खालावत आहेत असेही हॉस्पिटल मधुन सांंगण्यात आले आहे.प्रणब मुखर्जी यांंच्या फुफ्फुसांंना झालेल्या संसर्गासाठी उपचार सुरु आहेत. प्रणब मुखर्जी यांंचे व्हायटल पॅरामीटर्स (Vital Parameters) स्थिर आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे. अशी माहिती रुग्णालयाकडून मिळत आहे.

प्रणब मुखर्जी यांची 10 ऑगस्ट रोजी ब्रेन सर्जरी झाली होती तेव्हापासून प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. आज 16 दिवसांनंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली असून त्यांना इतर जुने विकारही असल्याने चिंता आहे.

ANI ट्विट

दरम्यान मध्यंंतरी एका प्रसिद्ध पत्रकाराने प्रणब मुखर्जी यांंच्या निधनाचे ट्विट सुद्धा केले होते ज्यानंंतर बराच गोंंधळ झाला होता. मात्र प्रणब यांंचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी यांंचे आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असतात, त्यांंनीच अफवांंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2020 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).