Pranab Mukherjee Health Update: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक; R&R Hospital ची माहिती

दिल्लीच्या Army Research & Referral हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे

Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

दिल्लीच्या Army Research & Referral हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. 10 ऑगस्ट दिवशी त्यांच्यावर ब्रेन क्लॉटची शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान ते कोरोना पॉझिटीव्ह देखील आहेत. सध्या व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आले असून haemodynamically stable असल्याची माहिती हॉस्पिटल कडून देण्यात आली आहे.

84 वर्षीय प्रणब मुखर्जी haemodynamically stable आहेत. म्हणजे ही अशी स्थिती आहे जेव्हा रूग्णाच्या शरीरात स्थिर स्वरूपाय हृद्यामध्ये रक्त पंप होत आहे. Hemodynamic monitoring हे रक्त वाहिन्या, हृद्य आणि धमन्यांमधील रक्तदाब याची माहिती देत असतो. याद्वारा रक्तामधील ऑक्सिजन पातळीचीदेखील माहिती मिळते. सामान्यपणे रूग्णाचे हृद्य नीट काम करत आहे की नाही याची माहिती याद्वारा मिळते.

10ऑगस्ट दिवशी ब्रेन सर्जरी पूर्वी प्रणब मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोविड 19 चे निदान झाले आहे. काही चाचण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये कोविड 19ची चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली आहे.

ANI Tweet

दरम्यान आज प्रणब मुखर्जी यांची लेक शर्मिष्ठा मुखर्जी हीने देखील वडील प्रणब मुखर्जी यांचासोबतचा जुना फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहली आहे. वर्षभरापूर्वी माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवसांपैकी एक होता जेव्हा 8 ऑगस्ट 2019 ला माझ्या वडिलांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. आणि आता वर्षभराने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.