Saquib Nachan Death: ISIS चा माजी प्रमुख आणि मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी साकिब नाचनचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन
ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी नाचन यांना गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती अचानक बिघडल्याने नाचनला मंगळवारी तिहार तुरुंगातून हलवण्यात आले.
Saquib Nachan Death: स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चे माजी पदाधिकारी साकीब नाचन (Saquib Nachan) यांचे शनिवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी नाचन यांना गेल्या चार दिवसांपासून दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती अचानक बिघडल्याने नाचनला मंगळवारी तिहार तुरुंगातून हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी नाचनचा मृत्यू ब्रेन हॅमरेज झाल्याची पुष्टी केली आहे. शनिवारी दुपारी 12:10 वाजता साकिब नाचनचा मृत्यू झाला.
ISIS कारवाईदरम्यान साकिब नाचनला अटक -
2023 मध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS-संबंधित मॉड्यूलवरील मोठ्या देशव्यापी कारवाईदरम्यान नाचनला अटक केली होती. कारवाईचा भाग म्हणून एजन्सीने छापे टाकलेल्या अनेक ठिकाणांपैकी पडघा येथील त्याच्या निवासस्थानाचा समावेश होता. (हेही वाचा - Telugu Anchor Dies By Suicide: तेलुगू न्यूज चॅनेलची प्रसिद्ध महिला अँकरची आत्महत्या; घरात पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह)
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी -
दरम्यान, नाचनवर 2003 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोप होता. मुंबई बॉम्बस्फोटात अनेक लोकांनाचा मृत्यू झाला होता. तो अनेक देशविरोधी कारवायांमध्येही सामील होता, ज्यासाठी तो भारतीय सुरक्षा एजन्सींच्या रडारवर होता. 2023 मध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलवर देशव्यापी कारवाईचा भाग म्हणून नाचनला अटक केली. भारतात या गटाच्या कारवाया वाढविण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जात होते.
तिहार तुरुंगात बिघडली तब्येत -
प्राप्त माहितीनुसार, नाचनवर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आज दुपारच्या सुमारास साकिब नाचना मेंदूतील रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2025 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

