माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन
आज 9 वाजल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले आहे. आज 9 वाजल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या, काहीच वर्षांपूर्वी त्यांचे किडनी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन देखील झाले होते. आज अखेरीस त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
ANI ट्विट
सुषमा स्वराज यांनी आज तीन तासांपूर्वी काश्मीर मधील कलम 370 हटवल्यावरून मोदी सरकारचे कौतुक करणारी एक ट्विट सुद्धा केले होते ज्यामध्ये त्यांनी हा ऐतिहासिक दिवस जिवंतपणी पाहता आल्याचा आनंद व्यक्त केला होता.मात्र त्यानंतर अवघ्या काहीच तासात त्यांचे निदाहण झाल्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुषमा स्वराज ट्विट
दरम्यान सुष्मा यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून महत्वाचे भूमिका बजावली होती पण तब्येतीच्या कारणाने यंदाच्या मोदी सरकारमध्ये त्यांनी आपल्याला मंत्रीपद न देण्याची विनंती केली होती. मात्र यानंतरही त्यांची अवस्था आणखीनच खालावत गेली.