Bharat Ratna: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान (VIDEO)

अडवाणी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजप नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते.

LK Advani | (Photo Credit: X/PTI)

माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी भारतरत्न (Bharat Ratna) प्रदान केले. अडवाणी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजप नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. केंद्र सरकारने यावर्षी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन आणि दोन वेळा बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर चार भारतरत्न पुरस्कार जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट X वर 3 फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती की, माजी उप-पंतप्रधान ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी उपपंतप्रधान यांना भारतरत्न पुरस्कार हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाईल. या वेळी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेदरम्यान पंतप्रधानांनी म्हटले होते की, "ते (अडवाणी) आमच्या काळातील सर्वात प्रसिद्ध राजकारण्यांपैकी एक आहेत आणि भारताच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या जीवनाची सुरुवात तळागाळातून झाली आणि आमचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची सेवा केली," असे म्हटले. अडवाणींना हा पुरस्कार मिळणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. (हेही वाचा, Bharat Ratna: एका वर्षात किती जणांना भारतरत्न दिला जाऊ शकतो? काय आहेत नियम? पुरस्कारासंदर्भातील 'या' खास बाबी घ्या जाणून)

भारती जनता पक्षाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सन 2004 मध्ये प्रथमच सत्ता मिळाली. त्या वेळच्या केंद्र सरकारमध्ये अडवाणी हे उपपंतप्रधान राहिले आहेत. त्यासोबतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि पुढे भारतीय जनता पक्षाचे शिर्ष नेते राहिले आहेत. प्रदीर्घ काळ ते भाजपाध्यक्ष होते. 1990 च्या दशकात पक्षाच्या विकासाला मार्गदर्शन करण्याचे आणि सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अध्यक्षांपैकी एक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. (हेही वाचा, Bharat Ratna 2024: लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर यांच्यासह अन्य तिघांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार भारतरत्न पुरस्कार प्रदान)

एक्स पोस्ट

लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. अखंड हिंदुस्तानची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर आडवाणी कुटुंबीय भारतात आले. त्यानंतर आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुढे भारतीय जनता पक्षासोबत राजकीय कार्यक्रमांना जोडून घेतले.

लालकृष्ण आडवाणी भारती राजकारणात त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. खास करुन रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी काढलेली रथयात्रा देशभर गाजली. ज्याचे पर्यावसन पुढे बाबरी मशीद पाडण्यात झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधानदेखील राहिलीले आहेत. भाजपकडून प्रदीर्घ काळ ते पंतप्रधान पदाचेही दावेदार राहिले. मात्र, लोकसभा निवडणूक 2004, 2009 मध्ये भाजपला सलग अपयश आले आणि लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या चेहऱ्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाच्या दावेदारावरुन बाजूला व्हावे लागले.