माजी CJI रंजन गोगोई त्यांच्या राज्यसभेवरील नियुक्ती बाबत लवकरच स्पष्ट करणार भूमिका, म्हणाले - ' आधी शपथ घेऊ द्या'

त्यानंतर विविध स्तरातून गोगाई यांच्यासोबतच मोदी सरकारवर टीका करण्यात आली.

Ranjan Gogai | Photo Credits: Twitter

भारताचे माजी सरन्यायाधीश जस्टिस रंजन गोगाई ( Ranjan Gogoi) यांची काल (16 मार्च) राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा झाली. त्यानंतर विविध स्तरातून गोगाई यांच्यासोबतच मोदी सरकारवर टीका करण्यात आली. मात्र आज याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्याचे रंजन गोगाई यांनी टाळले आहे. दरम्यान ANI Tweet नुसार माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई उद्या (18 मार्च) दिवशी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर मला राज्यसभेत खासदार पदाची शपथ घेऊ द्या. नंतरच मी ही नियुक्ती का स्वीकारली याबाबत सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान 26 मार्च दिवशी राज्यसभेच्या निवडणूका पार पडतील. जितेंद्र आव्हाडांचा रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीला विरोध! ट्वीटर वर व्यक्त केली नाराजी.

काल रात्री भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून एका परिपत्रकाच्या माध्यमातून रंजन गोगाई यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येत आहे अशी माहिती देण्यात आली आहे. हे वृत्त समजताच अनेकांनी आजच्या न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभी केली आहेत.

ANI Tweet

दरम्यान रंजन गोगाई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 ला झाला. ते मूळचे आसामी असून त्यांचे वडील कॉंग्रेस पक्षाचे नेते होते.रंजन गोगाई यांची गुवाहटी उच्च न्यायलयात वकिलीची सुरूवात 1978 मध्ये झाली. त्यानंतर 2001 साली ते गुवाहटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. पुढे त्यांनी पंजाब आणि हरियाणा न्यायालयातही काम केले आहे.