भारतीय बनावटीची पहिली सेमीकंडक्टर चीप डिसेंबर 2024 मध्ये उपलब्ध होणार असल्याची Union Minister Ashwini Vaishnaw यांनी दिली माहिती

Micron च्या माहितीनुसार, 5000 नवे थेट रोजगार आणि 15 हजार कम्युनिटी जॉब्स आणले जाणार आहेत.

Ashwini Vaishnaw | (Photo Credit - Facebook)

भारतीय बनावटीचा पहिला सेमी कंडक्टर (Semiconductor) डिसेंबर 2024 मध्ये उपल्ब्ध होईल असा अंदाज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnaw) यांनी वर्तवला आहे. 4-5 सेमी कंडक्टर प्लांट्स येत्या वर्षभरामध्ये भारतामध्ये सुरू केले जातील असेही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे जॉईंट स्टेटमेंट वाचून दाखवताना वैष्णव यांनी मेड इंडिया पहिली चीप डिसेंबर 2024 मध्ये येणार असल्याचं म्हटलं आहे.

वैष्णव यांच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये उभारण्यात येणाऱ्या मायक्रॉन सेमीकंडक्टर प्लांटसाठी जमीन वाटप, फॅक्टरी डिझाइनचे काम आणि टॅक्स कम्प्लायंस संबंधित करार पूर्ण झाला आहे. "मायक्रॉनची पहिली मेड-इन इंडिया चिप आतापासून सुमारे सहा तिमाहीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे." कॉम्प्युटर स्टोरेज चिप बनवणारी कंपनी मायक्रोन गुजरातमध्ये आपले सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी प्लांट स्थापन करणार असून त्यासाठी एकूण 2.75 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 22,540 कोटी रुपये) गुंतवणूक केली जाईल. नक्की वाचा: BSNL 5G Launch Soon: भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार BSNL कडून 5जी सेवा- मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती .

प्लांटचा खर्च 825 मिलियन यूएसडी आहे. हा दोन टप्प्यातील प्रकल्प आहे. सुविधेचे टप्प्याटप्प्याने बांधकाम 2023 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. फेझ 1 मध्ये 500,000 स्क्वेअर फीटची जागा 2024 पासून वापरात आणली जाणार आहे. Micron च्या माहितीनुसार, 5000 नवे थेट रोजगार आणि 15 हजार कम्युनिटी जॉब्स आणले जाणार आहेत.