Father Raped His Minor Daughters: फरिदाबादमध्ये वडिलांनी केला दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; आरोपीला अटक, पत्नीच्या तक्रारीवरून कारवाई

वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे मोठ्या मुलीचे म्हणणे आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

हरियाणाच्या फरीदाबादमधून (Faridabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फरिदाबादमध्ये आपल्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी एका बापाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, तिला दोन मुली असून त्यांचे वय 11 आणि 13 वर्षे आहे. महिलेने सांगितले की ती मजूर म्हणून काम करते आणि तिच्या पतीला अमली पदार्थाची वाईट सवय आहे.

पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की, ती शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी कामावरून घरी परतली तेव्हा तिच्या मोठ्या मुलीने तिला घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे मोठ्या मुलीचे म्हणणे आहे. महिलेने पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी तिच्या लहान मुलीवर बलात्कार केल्याचे तिच्या मोठ्या मुलीने तिला सांगितले होते.

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, हा प्रकार आपल्या पत्नीला समजल्याचे पतीला कळल्यावर आरोपीने या तिघींनाही याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र महिलेने पतीविरुद्ध एसजीएम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून रविवारी 17 नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (हेही वाचा: Alwar Shocker: राजस्थानमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, घटनेचे चित्रिकरण करुन व्हिडिओ सशल मीडियावर शेअर; पीडितेची आत्महत्या)

दरम्यान, नुकतेच राजस्थानच्या भरतपूर परिसरातूनही असेल प्रकरण समोर आले होते. जिथे एका बापाने आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने रुदवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ती सातवीत शिकते. या मुलीला दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणी सध्या आजीकडे आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी वडिलांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. वडिलांनी याधीही असा प्रयत्न केल्याचे मुलीने सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif