Bus Accident In Almora at Uttarakhand: उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, 25 हून अधिक जणांचा मृत्यू

या अपघातात 25 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

Bus Accident In Almora at Uttarakhand (फोटो सौजन्य - X/@Kishor_Joshi098)

Bus Accident In Almora at Uttarakhand: उत्तराखंडमधील (Uttarakhand) अल्मोरा (Almora) येथे भीषण अपघात (Accident) झाला आहे. मार्चुलाजवळ बस खड्ड्यात पडली. या अपघातात 25 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नयनी दांडा येथून रामनगरकडे जाणारी बस आज सकाळी खड्ड्यात पडली. बस गीत जहागीर नदीच्या काठावर पडल्याने अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. अपघातग्रस्त बस नैनीदांडा येथील किनाथ येथून प्रवासी घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही बस रामनगरला जाणार होती. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Accident On Thane-Belapur Road: दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

उत्तराखंडमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली, पहा व्हिडिओ - 

प्राप्त माहितीनुसार, मार्चुला येथे बसचे नियंत्रण सुटले आणि बस खोल खड्ड्यात पडली. बसमध्ये 40 प्रवासी होते. या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जिल्हा दंडाधिकारी आलोक कुमार पांडे यांनी सांगितले की, घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आली आहे. एसडीएम आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बचाव कार्य संपल्यानंतर मृतांचे योग्य आकडे समोर येतील.