FASTag 1 डिसेंबरपासून सर्व गाड्यांसाठी होणार बंधनकारक; पाहा कसा बनवाल हा पास

तुमच्या गाडीवर फास्टॅगन नसल्यास तुम्हाला टोलनाक्यावरुन जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

Fastag (Photo Credits: Twitter)

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी टोलनाक्यामुळे होणारा नाहक त्रास कायमचा नष्ट करण्यासाठी 1 डिसेंबरपासून फास्टॅग ही सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. तुमच्या गाडीवर फास्टॅग (FASTag) नसल्यास तुम्हाला टोलनाक्यावरुन जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर येणा-या टोलनाक्यांचे अडथळे पार करुन वेळ वाचविण्यासाठी सरकारने प्रवाशांसाठी हा उपक्रम राबविला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा हा उपक्रम खरच खूप स्तुत्यप्रिय असून सर्वच स्तरांतून याचे स्वागत होत आहे.

या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे डिजिटल पेमेंटला आणखी प्रोत्साहन देणे आणि त्याचा प्रसार करणे. या फास्टॅगमध्ये ओळख पटण्यासाठी (RFID) तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून फास्टॅग लावलेले चार चाकी वाहन जेव्हा टोलनाक्यावर जाईल तेव्हा तेथील खांब्यावर लागलेला स्कॅनर गाडीवर लावलेल्या स्टीकर ला स्कॅन करेल. ज्यामुळे फास्टॅग अकाउंटवरुन पैसे सरळ कट होतील. हा स्टीकर देशभरात कुठेही प्रवास करताना कामी येईल.

हेदेखील वाचा- 1 डिसेंबर पासून देशात लागू होणार FASTags योजना; टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही; जाणून घ्या डीटेल्स

सरकारने राष्ट्रीय राजमार्गांवर 1 डिसेंबरपासून फास्टॅग लेन मध्ये बदलण्यात आले आहे. या लेनला हायब्रिड लेनमध्ये बदलण्याची योजना बनविण्यात आली आहे. या योजनेची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

कसे बनवाल फास्टॅग पास:

IHMCL/NHAI द्वारा 28,500 विक्री केंद्रावरुन तुम्हील हा पास खरेदी करु शकता. यत प्लाझा, आरटीओ, साझा सेवा केंद्र, परिवहन केंद्र, बँकेच्या शाखांचा समावेश आहे.