Farmers Protest: शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच; दिल्ली पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश, सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी

त्यानंतर त्यांनी आज (14 डिसेंबर) पुन्हा एकदा मोर्चाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दील्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

Delhi Police Farmers Protest | (Photo Courtesy: X)

Delhi Chalo Farmers Protest: चलो दिल्ली म्हणत देशभरातील शेतकरी राजधानीच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दिल्लीकडे जाताना शेतकऱ्यांनी रात्रीची विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी आज (14 डिसेंबर) पुन्हा एकदा मोर्चाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दील्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Huge Traffic On Delhi Border) पाहायला मिळत आहे. पोलिसांनी मार्गावर अडथळे उभा केल्याने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये प्रवेश करण्यात विलंब होत आहे. परिणामी आंदोलक पोलिसांनी रस्त्यात उभारलेले अडथळे दूर करुन पुढे जाऊ पाहात आहेत.

दरम्यान, शेतकरी आंदोलन आणि त्याच्या व्याप्तीची पाहता पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या वाहतूक बदलामुळे बुधवारी दिल्लीच्या सीमावर्ती भागात वाहतुकीवर परिणाम झाला. हरियाणाच्या सिंघू आणि टिकरी सीमा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गाझीपूर सीमेवर नियमितपणे वाहनांच्या हालचालींना परवानगी आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा रोखण्यासाठी सिंघू सीमेजवळील एका गावातील रस्त्याचा एक भाग खोदण्यात आला. (हेही वाचा, Tear Gas Fired At Farmers Protest: शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या; पंजाब-हरियाणा सीमेवरी घटना)

महत्त्वाच्या मागण्यांवर निर्णय अद्यापही प्रलंबीत

शेतकऱ्यांच्या मागण्या प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत (MSP), शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची हमी देणारा कायदा लागू करणे यावर केंद्रित आहेत. सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्या तरी महत्त्वाचे मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत.  (हेही वाचा, Farmers’ March: शेतकरी आंदोलनाची हाक, राजधानीकडे कूच; दिल्ली-यूपी सीमेवर कलम 144 लागू, शंभू सीमा सील)

शेतकऱ्यांवर अश्रुधुर आणि पाण्याचा मारा

पलिसांनी शेतकऱ्यांना पंजाब-हरियाणा सीमा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. मात्र, शेतकऱ्यांनी मागे हटण्यास नकार दिला. पोलिसांनी रस्त्यात उभारलेले अडथळे, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा यांना भेतून आंदोलक पुढे जाऊ पाहात आहेत. (हेही वाचा, 'Delhi Chalo' Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर ठाम, दिल्ली हाय अलर्टवर; वाहतुकीवर निर्बंध, सीमा बंद; जाणून घ्या 10 मुद्दे)

एक बैठक निष्फळ, संवादासाठी सरकारचे निमंत्रण कायम

केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करत आहेत. या वाटाघाटी करताना एक बैठक निष्फळ झाली आहे. त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शांततापूर्ण संवादाच्या महत्त्वावर भर देत शेतकऱ्यांना हिंसा आणि जाळपोळ टाळण्याचे आवाहन केले.

पोलिसांकडून रस्त्यात अडथळे

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी रस्त्यावर अडथळे उभारले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस चौक्या स्थापन केल्या आहेत. पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमा शेतकरी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यातील संघर्ष पाहता सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

मोठी वाहतूक कोंडी

दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमा बंद केल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या रस्त्याचा वापर करुन राजधानीच्या शहरात प्रवेश करणाऱ्या नियमीत प्रवासी, नागरिक, नोकरदार वर्ग आणि इतरांनाही मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.