Farmers Protest, Tractor Rally: ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी पाकिस्तानमधून 300 ट्विटर हँडल्सची निर्मिती- दिल्ली पोलीस
ट्रॅक्टर्स रॅली हे आमच्यासाठीही एक मोठे आव्हान आहे.
राजधानी दिल्लीच्या (Delhi) सीमवेर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास (Farmers Protest) 50 दिवस केव्हाच उलटून गेले. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या चर्चेच्या 12 फेऱ्या होऊनही तोडगा निगाला नाही. त्यामुळे आक्रमक झालेले शेतकरी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच उद्या (26 जानेवारी 2021) राजधाली दिल्ली येथे ट्रॅक्टर मोर्चा (Tractor Rally) काढणार आहे. हा मोर्चा हायजॅक करण्यासाठी आणि मोर्चात गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानमधून सुमारे 300 ट्विटर हॅण्डल्स बनविण्यात आल्याची माहिती आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केल आहे. पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी या पार्श्वभूमिवर माहिती देताना सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपताच अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल.
इतर यंत्रणांकडून माहिती मिळाल्याचा दावा करत दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, पाकिस्तानातून तयार करण्यात आलेली 300 ट्विटर हँण्डल्स ही साधारण 13 ते 18 जानेवारी या कालावधीत तयार करण्यात आली आहेत. ट्रॅक्टर्स रॅली हे आमच्यासाठीही एक मोठे आव्हान आहे. परजासत्ताक दिनाची परेड संपताच अत्यंत कड सुरक्षा व्यवस्थेत हा मोर्चा काढला जाईल, अशी माहितीही पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. (हेही वाचा, Farmers March In Maharashtra: संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार)
दिल्ली पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानातून दहशतवादी काहीतरी मोठा अडथळा किंवा समस्या निर्माण करु शकतात. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पाकिस्तानातील सुमारे 308 ट्विटर हँडल्स ही सातत्याने Farmer Protest, Tractor Rally याबाबतचा हॅशटॅग वापरताना आढळून येत आहेत.
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्ली येथे जमले आहेत. यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा मोठा समावेश आहे. दरम्यान, देशभरातील राज्यांच्या राजभवनांवरही शेतकरी प्रादेशिक पातळीवर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातही या मोर्चाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नाशिक आणि राज्याच्या इतर भागांतून आलेले शेतकरी आणि कामगार मुंबई येथे रविवारी दाखल झाले आहेत. हे शेतकरी राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चांत शेतकरी, कामगार ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत.