Fact Check: आरबीआय करतंय सोने विक्री? पहा व्हायरल रिपोर्ट्समागील सत्य
मात्र आज स्वतः रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन याबाबतच्या वृत्ताना अफवा म्ह्णून घोषित केले आहे
मागील तीन दशकात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) तर्फे सोन्याची विक्री सुरू करण्यात आली असून बँकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारत यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगला देखील सुरुवात केली आहे अशा आशयाचे वृत्त मागील दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये पाहायला मिळत होते. मात्र आज स्वतः रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन याबाबतच्या वृत्ताना अफवा म्ह्णून घोषित केले आहे. रिझर्व्ह बँक अशा सोने विक्रीच्या किंवा ट्रेडिंगच्या कार्यात सक्रिय नसून यापुढे देखील या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचे नियोजित नाही असेही आरबीआय तर्फे सांगण्यात आले आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं. अशाप्रकारचं वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्विट नुसार, सोने विकल्याच्या किंवा येत्या काळात विकले जाण्याच्या बातम्या या अफवा आहेत. मागील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आणि विक्रीमध्ये बदल झाले होते, यामुळेच Weekly Statistical Supplement (WSS) या बँकेच्या कामकाजाशी संबंधित अहवालात चढउतार दिसून आले.
Fact Check: 2 हजाराची नोट बंद होणार? आरबीआयने दिले 'असे' स्पष्टीकरण
ANI ट्विट
दरम्यान, आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण 5.1 अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केले आहे, तर 1.15 अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत 19.87 दशलक्ष औंस कोटी सोने होते तर, 11 ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये केवळ 26.7 अब्ज डॉलर सोनं होते’, याबाबत दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात माहिती दिली होती. याशिवाय सोन्याच्या विक्रीतून निर्धारीत लाभापेक्षा जास्त लाभ सरकारसोबत आरबीआय शेअर करणार असल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं. पण, आरबीआयने हे वृत्त फेटाळून या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.